वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारताने ६ गड्यांच्या मोबदल्यात २०३ धावांपर्यंत मजल मारली. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा जेसन होल्डरचा निर्णय विंडीजच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली हे झटपट माघारी परतले. यानंतर लोकेश राहुल आणि अजिंक्य रहाणेने चौथ्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी केली. महत्वाची गोष्ट म्हणजे पहिल्या कसोटीआधी दोन वर्षांमध्ये लोकेश राहुल आणि अजिंक्य रहाणे यांची सरासरी ही सर्वात कमी होती. मात्र या दोन्ही अनुभवी खेळाडूंनी वेळेला धावून येत भारताचा डाव सावरला.

लोकेश राहुलने ४४ तर अजिंक्य रहाणेने ८१ धावांची खेळी केली. लोकेश राहुल रोस्टन चेसच्या गोलंदाजीवर तर अजिंक्य रहाणे गॅब्रिअलच्या गोलंदाजीवर माघारी परतला. लोकेश राहुल माघारी परतल्यानंतर अजिंक्यने हनुमा विहारीच्या साथीने पुन्हा एकदा भागीदारी रचत संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. त्यामुळे दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाज धावसंख्येत किती भर घालतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – Ind vs WI : ….म्हणून रोहित-आश्विनला संघात स्थान मिळालं नाही – अजिंक्य रहाणे