विश्वचषक स्पर्धेत भारताचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि उप-कर्णधार रोहित शर्मा यांच्यामध्ये मतभेद असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. संघाला पाठीमागे सोडून रोहित आपली पत्नी आणि मुलीसह एकटात भारतात निघून आल्यामुळे या चर्चांना अधिक उधाण आलं होतं. विंडीज दौऱ्यावर निघण्याआधी कर्णधार विराट कोहलीने या सर्व चर्चा चुकीच्या असल्याचं सांगितलं होतं. मी प्रत्येकवेळी रोहितच्या खेळाचं कौतुक केल्याचंही विराट म्हणाला होता.
अवश्य वाचा – माजी पाकिस्तानी खेळाडूला विराटचा धोबीपछाड, मानाच्या यादीत पटकावलं पहिलं स्थान
मैदानाबाहेरील या चर्चांचा रोहित-विराटच्या मैदानातील कामगिरीवर मात्र अजिबात परिणाम होताना दिसत नाहीये. वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या वन-डे सामन्यात विराट-रोहित जोडीने महत्वपूर्ण अर्धशतकी भागीदारी करत श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिलशान आणि कुमार संगकारा या जोडीला मागे टाकलं.
Highest average as a pair in ODIs (Min. 4000 runs):
66.46* Kohli-Rohit
53.67 Dilshan-Sangakkara
52.58 Greenidge-Haynes
50.14 Dravid-Ganguly#WIvInd— Bharath Seervi (@SeerviBharath) August 11, 2019
सलामीवीर शिखर धवन स्वस्तात माघारी परतल्यामुळे भारतीय संघाची सुरुवात खराब झाली होती. मात्र यानंतर विराट कोहलीने रोहित शर्माच्या साथीने संघाचा डाव सावरला. विराट-रोहितने दुसऱ्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी केली. या दरम्यान विराटने आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. अखेरीस रोस्टन चेसने रोहित शर्माला १८ धावांवर माघारी धाडत भारताची जमलेली जोडी फोडली.
अवश्य वाचा – Video : लेट आलोय पण थेट आलोय ! विराट कोहलीने पूर्ण केलं #BottleCapChallenge
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 11, 2019 9:18 pm