News Flash

IND vs WI : भारताच्या गब्बरला त्याच्या ‘स्टाईल’मध्ये उत्तर

शिखरने केल्या ४० चेंडूत ३८ धावा

IND vs WI : विंडीजविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताने २२४ धावांनी विजय मिळवला. रोहित, रायडूची वादळी खेळी आणि गोलंदाजांचा अचूक मारा या बळावर भारताने सामना जिंकत मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. भारताच्या ३७७ धावांमध्ये रोहित शर्माने १६२ तर रायडूने १०० धावा ठोकल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजची फलंदाजी ढेपाळली आणि त्यांना १५३ धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून डावखुरा वेगवान गोलंदाज खलील अहमद याने सर्वाधिक ३ बळी टिपले.

या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत ३७७ धावा केल्या. पण भारताचा सलामीवीर शिखर धवन याला मात्र आपली छाप उमटवता आली नाही. धवनने डावाची सुरुवात चांगली केली होती. तो ३९ चेंडूत ३८ धावा करून खेळत होता. यात त्याने ४ चौकार आणि २ षटकार लगावले होते. पण त्याला त्याचे मोठ्या धावसंख्येत रूपांतर करता आले नाही. १२व्या षटकाच्या ५ व्या चेंडूवर तो किमो पॉल याच्या गोलंदाजीवर बाद झाला. जवळच उभ्या असलेल्या फिल्डरने त्याचा उत्तम झेल टिपला. त्यावेळी धवनला त्याच्याच भाषेत उत्तर मिळाले.

शिखर धवन जेव्हा क्षेत्ररक्षण करत असतो, तेव्हा त्याच्याकडून फलंदाज धावचीत झाला किंवा त्याने झेल टिपला तर मांडी थोपटून सेलिब्रेशन करतो. तसेच प्रकारचे सेलिब्रेशन आज किमो पॉल याने केले शिखर बाद झाल्यावर केले. त्याने त्याच्याच स्टाईलमध्ये सेलिब्रेशन केले. सामन्यातील हा क्षण अनेकांच्या चर्चेचा विषयदेखील ठरला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2018 9:17 pm

Web Title: ind vs wi shikhar dhawan got answer in his style after getting out
Next Stories
1 IND vs WI : भारताच्या रो’हिट’पुढे विंडीज नेस्तनाबूत
2 Ind vs WI : पहिल्या डावात 12 विक्रमांची नोंद, शतकवीर रोहित चमकला
3 2013-18, सलग 6 वर्ष रोहितच वन-डे क्रिकेटचा राजा!
Just Now!
X