विंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील अंतिम सामन्यात भारताने विंडीजला ९ गडी राखून पराभूत केले आणि विंडीजविरुद्ध सलग आठवा मालिका विजय नोंदवला. विंडीजचा डाव अवघ्या १०४ धावांत गुंडल्यानंतर भारताने हे आव्हान १५ षटकाच्या आत पूर्ण केले. रवींद्र जाडेजाच्या अप्रतिम फिरकीच्या जोरावर भारताने विंडीजला १०४ धावांत रोखले होते. त्यानंतर रोहित शर्माच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने सामना जिंकला आणि मालिका ३-१ने खिशात घातली. रवींद्र जाडेजाला सामनावीर तर विराटला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले.

या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर रोहित शर्मा याने एक नवीन पराक्रम केला. रोहित सामन्यात ३२ धावांवर खेळ होता. रोहित शर्माला सामना सुरु होण्याआधी षटकारांचे द्विशतक करण्यास दोन षटकरांची गरज आहे. त्याच्या नावावर १९२ एकदिवसीय सामन्यात १९८ षटकार होते. अंतिम एकदिवसीय सामन्यात दोन षटकार लगावत त्याने २०० षटकार पूर्ण केले.

षटकरांचे द्विशतक पूर्ण करण्याची कामगिरी करणारा रोहित हा दुसरा भारतीय फलंदाज ठरला. आता त्याच्यापुढे केवळ धोनी आहे. सध्या धोनीच्या नावावर २१८ षटकार आहेत.