रोहित शर्मा आणि अंबाती रायुडू यांनी केलेल्या द्विशतकी भागीदारीच्या जोरावर भारताने विंडीजसमोर 378 धावांचं आव्हान दिलं. रोहितने विंडीजच्या गोलंदाजीचा समाचार घेत 162 धावांची खेळी केली. रायुडूनेही 100 धावा काढत रोहितला चांगली साथ दिली. विंडीजचे सर्व गोलंदाज भारतीय फलंदाजांसमोर फोल ठरले. दरम्यान पहिल्या डावात भारतीय खेळाडूंनी तब्बल 12 विक्रमांची नोंद केली.

1 – सध्या सुरु असलेल्या मालिकेत विराटने आतापर्यंत 420 धावा पटकावल्या आहेत. विंडीजविरुद्ध मालिकेत एखाद्या फलंदाजाने नोंदवलेली ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली आहे.

1 – ब्रेबॉन स्टेडीयमवरचं रोहित शर्माचं हे पहिलं शतक ठरलं.

1 – वन डे क्रिकेटमध्ये 7 दीड शतकं झळकावणारा रोहित पहिलाच फलंदाज ठरला आहे.

2 – शिखर धवन आणि रोहित शर्मा जोडीने सलामीच्या विकेटसाठी सचिन-सेहवागच्या जोडीवर असलेला 3919 धावांचा विक्रम मोडला. याव्यतिरीक्त सचिन-सौरव गांगुली जोडीने (6609 धावा) शिखर धवन-रोहित शर्मा जोडीपेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

अवश्य वाचा – 2013-18, सलग 6 वर्ष रोहितच वन-डे क्रिकेटचा राजा!

2 – भारताकडून वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित दुसऱ्या स्थानावर आहे. रोहितने सचिन तेंडुलकरचा 195 षटकारांचा विक्रम मोडीत काढला, रोहितच्या नावावर आता 196 षटकार जमा झाले आहेत.

2 – वन-डे क्रिकेटमध्ये सलामीवीर या नात्याने रोहित शर्माचं हे 19 वं शतक ठरलं. भारताकडून अशी कामगिरी करणारा तो दुसरा फलंदाज ठरला आहे. सचिन तेंडुलकरने सलामीवीर या नात्याने 45 शतकं झळकावली आहेत.

2 – हॅमिल्टन मासाकात्झा याच्यानंतर एका मालिकेत दोन दीड शतकी खेळी करणारा रोहित दुसरा फलंदाज ठरला आहे.

2 – रोहित शर्माची 162 धावांची खेळी ही कोणत्याही भारतीय फलंदाजाने विंडीजविरुद्ध केलेली दुसरी सर्वोत्तम खेळी ठरली.

4 – रोहित शर्माने वन-डे क्रिकेटच्या इतिहासातलं 21 वं शतक झळकावलं. 186 डावांमध्ये रोहितने ही कामगिरी केली. अशी कामगिरी करणारा रोहित सर्वात चौथा जलद फलंदाज ठरला आहे.

5 – द्विपक्षीय वन-डे मालिकेत 300 धावा पार करण्याची रोहित शर्माची ही पाचवी वेळ ठरली आहे. विराट कोहलीने 7 वेळा अशी कामगिरी केली आहे.

अवश्य वाचा – Ind vs WI : सचिनला मागे टाकत रोहित ठरला षटकारांचा बादशहा

13 – वन-डे क्रिकेटच्या इतिहासात 375 ची धावसंख्या पार करण्याची भारताची 13 वी वेळ ठरली.

16 – विराट कोहलीने आजच्या सामन्यात 16 धावा काढल्या. 2018 सालात वन-डे क्रिकेटमधली विराटची ही सर्वात निच्चांकी धावसंख्या ठरली आहे.

अवश्य वाचा – रो’हिट’ शर्मानं केला आणखी एक विश्वविक्रम