07 April 2020

News Flash

Video : शिखर, श्रेयस आणि खलीलने केला भन्नाट डान्स

विराटनेही पोस्ट केला बीचवरचा फोटो

टी २० आणि एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर कसोटी मालिका जिंकून दौऱ्याचा शेवट गोड करण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. भारतीय संघाच्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेला उद्यापासून सुरूवात होणार आहे. त्याआधी झालेल्या ३ दिवसांच्या सराव सामन्यात भारताने वर्चस्व राखले. सराव सामन्यात काही खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष होते. त्यानुसार चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा, उमेश यादव या खेळाडूंनी आपली चमक दाखवत कसोटी मालिकेसाठी आपण सज्ज असल्याचे दाखवून दिले.

कसोटी मालिका हा विंडिज दौऱ्याचा शेवटचा टप्पा आहे. त्यामुळे या मालिकेआधी भारतीय संघाच्या खेळाडूंनी धमाल केली आणि बीचवर जाऊन आनंद लुटला. विराटने याबाबतचा फोटो शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

Stunning day at the beach with the boys

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

याशिवाय श्रेयस अय्यरनेही एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात श्रेयस अय्यर, खलील अहमद आणि शिखर धवन हे तिघे वेगवेगळ्या डान्स स्टेप्स करताना दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

Bout to drop a album soon @shikhardofficial @khaleelahmed13 @kieron.pollard55

A post shared by Shreyas Iyer (@shreyas41) on

दरम्यान, विंडिज दौऱ्यातील कसोटी मालिकेत या वेळी भारतीय संघातील खेळाडू एका वेगळ्याच रूपात दिसणार आहेत. पूर्वी कसोटी सामन्यात केवळ पांढऱ्या रंगाचा गणवेश आणि क्रिकेट मंडळाचा लोगो असायचा, पण आता मात्र टी शर्टवर नंबर आणि नावदेखील असणार आहे. भारतीय संघाच्या खेळाडूंचा हा नवा अवतार इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो स्टोरीवर ठेवण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2019 4:02 pm

Web Title: ind vs wi video shikhar dhawan khaleel ahmed shreyas iyer dancing in boat virat and team india enjoy beach vjb 91
Next Stories
1 BARC Ratings : भारत-विंडीज मालिकेची प्रेक्षकसंख्या घटली, प्रो-कबड्डीची मुसंडी
2 विंडिजला धूळ चारण्यासाठी टीम इंडिया सज्ज; पहा खास फोटो
3 टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेआधीच्या सराव परिक्षेत भारत पास
Just Now!
X