12 August 2020

News Flash

Ind vs WI : रिकी पाँटींगला मागे टाकत विराट कोहली ठरला यशस्वी कर्णधार

दुसऱ्या वन-डे सामन्यात विराटचं शतक

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या शतकी खेळीच्या जोरावर, दुसऱ्या वन-डे सामन्यात भारताने विंडीजसमोर २८० धावांचं आव्हान ठेवलं. विंडीजच्या गोलंदाजांचा समाचार घेताना विराटने १२५ चेंडूत १२० धावा केल्या. वन-डे कारकिर्दीतल विराटचं हे ४२ वं शतक ठरलं, तर कर्णधार या नात्याने विराटचं विंडीजविरुद्धचं हे सहावं शतक ठरलं.

एका प्रतिस्पर्ध्याविरोधात सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या कर्णधारांच्या यादीत विराटने माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटींगला मागे टाकलं आहे.

अवश्य वाचा – Ind vs WI : आफिकन खेळाडूंना पिछाडीवर टाकत विराट कोहली ठरला सर्वोत्तम

एका प्रतिस्पर्धी संघाविरोधात सर्वाधिक शतकं झळकावणारे कर्णधार –

  • विराट कोहली (६ शतकं) विरुद्ध वेस्ट इंडिज
  • रिकी पाँटींग (५ शतकं) विरुद्ध न्यूझीलंड
  • रिकी पाँटींग (४ शतकं) विरुद्ध इंग्लंड
  • रिकी पाँटींग (४ शतकं) विरुद्ध भारत
  • एबी डिव्हीलियर्स (४ शतकं) विरुद्ध भारत

विराटने आपल्या शतकी खेळीत १४ चौकार आणि एका षटकार लगावला. सलामीवीर शिखर धवन माघारी परतल्यानंतर विराट कोहलीने सर्वात प्रथम रोहित शर्मासोबत ७४ धावांची अर्धशतकी आणि श्रेयस अय्यरसोबत १२५ धावांची शतकी भागीदारी केली. त्याच्या या खेळीमुळे भारताने सामन्यात आश्वासक धावसंख्या गाठली.

अवश्य वाचा – Ind vs WI : ही आकडेवारी पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, होय विराट सचिनचा विक्रम मोडणार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2019 1:44 am

Web Title: ind vs wi virat kohli becomes successful captain after century against west indies broke ricky pointing record psd 91
Next Stories
1 Ind vs WI : ३०० व्या सामन्यात युनिव्हर्सल बॉस चमकला, लाराचा आणखी एक विक्रम मोडला
2 Ind vs WI : आफ्रिकन खेळाडूंना पिछाडीवर टाकत विराट कोहली ठरला सर्वोत्तम
3 Ind vs WI : ही आकडेवारी पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, होय विराट सचिनचा विक्रम मोडणार
Just Now!
X