News Flash

Ind vs WI : ही आकडेवारी पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल, होय विराट सचिनचा विक्रम मोडणार

दुसऱ्या वन-डे सामन्यात विराटचं शतक

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वन-डे सामन्यात शतकी खेळी करत पुन्हा एकदा आपला फॉर्म सिद्ध करुन दाखवला. विराटने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा समाचार घेताना १२५ चेंडूत १२० धावा केल्या. त्याच्या या खेळीत १४ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. या कामगिरीसह विराट कोहली वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे.

वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणारे भारतीय फलंदाज –

१) सचिन तेंडूलकर – १८ हजार ४२६

२) विराट कोहली * – ११ हजार ४०६

३) सौरव गांगुली – ११ हजार २२१

४) राहुल द्रविड – १० हजार ७६८

५) महेंद्रसिंह धोनी * – १० हजार ५९९

एका प्रतिस्पर्धी संघाविरोधात सर्वाधिक शतकं झळकावण्याच्या विक्रमामध्ये विराटने जवळपास सचिनला बरोबरीत गाठलं आहे.

याचसोबत एका प्रतिस्पर्ध्याविरोधात सर्वात जलद २ हजार धावा काढणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही विराटने सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्माला मागे टाकलं आहे.

सलामीवीर शिखर धवन माघारी परतल्यानंतर विराट कोहलीने सर्वात प्रथम रोहित शर्मासोबत ७४ धावांची अर्धशतकी आणि श्रेयस अय्यरसोबत १२५ धावांची शतकी भागीदारी केली. त्याच्या या खेळीमुळे भारताने सामन्यात आश्वासक धावसंख्या गाठली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 11, 2019 10:57 pm

Web Title: ind vs wi virat kohli score his 42nd century in odi will give tough competition to sachin tendulkar psd 91
टॅग : Ind Vs WI,Virat Kohli
Next Stories
1 काश्मिरी खेळाडूंसाठी धोनी सरसावला, क्रिकेट अकादमी स्थापन करण्याच्या तयारीत
2 Ind vs WI : रोहित-विराटची जोडी ठरतेय सर्वोत्तम, जाणून घ्या ही आकडेवारी
3 वन-डे संघात स्थान मिळवण्याबाबत अजिंक्य रहाणे म्हणतो….
Just Now!
X