06 July 2020

News Flash

Ind vs WI : पावसाने सामना थांबवला, विराटने गेलसोबत मैदानातच ठेका धरला

पावसाच्या व्यत्ययामुळे सामना सुरु होण्यास उशीर

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या सामन्याला पावसाचा फटका बसला. गयाना येथे सुरु असलेल्या पावसामुळे नाणेफेकीस उशीर झाला. पावसाचा जोर ओसरल्यानंतर पंचांनी खेळपट्टीची पाहणी करत मैदान खेळण्यायोग्य असल्याचं जाहीर केलं. नाणेफेक जिंकून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

मात्र सहाव्या षटकातच सामन्यात पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली. काही क्षणांनी पावसाचा जोर ओसरल्यानंतर खेळाडू काहीकाळासाठी मैदानात उतरले होते. मात्र मैदानातील एक भाग पावसामुळे ओला राहिल्याचं विराटने पंचांच्या निदर्शनास आणून दिलं. मैदानातील कर्मचारी हा भाग सुकवण्याचं काम करत असताना विराटने मैदानावर सुरु असलेल्या संगीताच्या ठेकावर ताल धरला. यावेळी विंडीजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेलनेही विराटला साथ दिली.

मैदानातील कर्मचाऱ्यांनी ओला भाग सुकवण्याचं काम केल्यानंतर, पंचांनी वाया गेलेला वेळ लक्षात घेऊन डकवर्थ लुईस नियमानुसार सामना ३४ षटकांचा खेळवण्यात येईल अशी घोषणा केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2019 10:58 pm

Web Title: ind vs wi virat kohli shows his dancing moves with chris gayle during rain break in 1st odi psd 91
Next Stories
1 Pro Kabaddi 7 : बंगळुरु बुल्सकडून तेलगू टायटन्सचा धुव्वा
2 Ind A vs WI A : अनौपचारिक कसोटी सामन्यात कृष्णप्पा गौथमची हॅटट्रीक
3 हाशिम आमलाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम
Just Now!
X