News Flash

माजी पाकिस्तानी खेळाडूला विराटचा धोबीपछाड, मानाच्या यादीत पटकावलं पहिलं स्थान

दुसऱ्या वन-डे सामन्यात विराटचा विक्रम

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने, पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू यांच्या नावावर असलेला विक्रम आपल्या नावे जमा केला आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली आता पहिल्या स्थानी पोहचला आहे. जावेद मियांदाद यांनी वेस्ट इंडिजविरोधात १९३० धावा केल्या आहेत. विराट कोहलीला हा विक्रम मोडण्यासाठी दुसऱ्या सामन्यात १९ धावांची गरज होती. शेल्डन कोट्रेलच्या गोलंदाजीवर १९ वी धाव पूर्ण करत विराटने हा विक्रम आपल्या नावे जमा केला आहे.

विंडिजविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे टॉप ५ फलंदाज –

  • विराट कोहली (भारत) – १९३१* धावा
  • जावेद मियांदाद (पाकिस्तान) – १९३० धावा
  • मार्क वॉ (ऑस्ट्रेलिया) – १७०८ धावा
  • जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका) – १६६६ धावा
  • रमीझ राजा (पाकिस्तान) – १६२४ धावा

मियांदादने विडिंजविरोधात ६४ डावांत एकूण १९३० धावा केल्या आहेत. त्यात एक शतक आणि १२ अर्धशतकांचा समावेश आहे. विराट कोहलीने आतापर्यंत विडिंजविरोधात ३३ डावांमध्ये १९१२ धावा केल्या आहेत. यामध्ये सात शतके आणि १० अर्धशतकांचा समावेश आहे.

अवश्य वाचा – Video : लेट आलोय पण थेट आलोय ! विराट कोहलीने पूर्ण केलं #BottleCapChallenge

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 11, 2019 7:33 pm

Web Title: ind vs wi virat kohli tops the list of most runs against west indies in odi beat former pakistan player javed miandad psd 91
Next Stories
1 Video : लेट आलोय पण थेट आलोय ! विराट कोहलीने पूर्ण केलं #BottleCapChallenge
2 Ind vs WI 2nd ODI : भारताची वेस्ट इंडिजवर ५९ धावांनी मात
3 Video : सरावाला पर्याय नाही ! ऋषभ पंतने सरावासाठी शोधली भन्नाट जागा
Just Now!
X