05 July 2020

News Flash

IND vs WI : विंडीज संघाबाबतच्या खोचक ट्विटवरून हरभजनला ‘बेस्ट’ चपराक

खोचक ट्विटचा विंडीजच्या खेळाडूने घेतला खरपूस समाचार

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने एक डाव आणि २७२ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयाबरोबर दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. हा सामना केवळ तीन दिवसांत संपला. त्यातही सुमारे दीड दिवस भारताने एक डाव फलंदाजी केली. आणि उर्वरित कालावधीत विंडीजच्या संघाचे दोन डाव संपुष्टात आले. भारताने पहिला डाव ६४९ धावा करून अखेर घोषित केला. पण विंडीजच्या संघाला दोन्ही डावात मिळूनही तितकी धावसंख्या उभारता आली नाही.

विंडीजच्या या सुमार कामगिरीवर सोशल मीडियावर प्रचंड टीका झाली. भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग यानेही खोचकपणे विंडीज संघाच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केले. मात्र या खोचक ट्विटचा विंडीजचा खेळाडू टिनो बेस्ट याच्याकडून खरपूस समाचार घेण्यात आला.

विंडीज संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर हरभजनने ट्विट केले होते. ‘विंडीज संघाचा मान राखून मी प्रश्न विचारू इच्छितो की विंडीजचा हा संघ रणजी करंडकाच्या प्लेट गटातून उपांत्यपूर्व फेरीत आला आहे का? कारण एलिट खेळाडूंकडून अशा पद्धतीची कामगिरी अपेक्षित नाही’, असा खोचक सवाल त्याने उपस्थित केला होता.

यावर टिनो बेस्ट याने खरोखरच ‘बेस्ट’ रिप्लाय देत हरभजनला चपराक लगावली. ‘इंग्लंड दौऱ्यात (तुझ्याकडून) असे खोचक ट्विट करण्यात आले नव्हते…. असो! विंडीजचा नवा संघ लवकरच शिकून प्रगती करेल’, असे ट्विट करत त्याने हरभजनला ‘क्लीन बोल्ड केले.

दरम्यान इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 9, 2018 1:35 pm

Web Title: ind vs wi west indian player tino best slams harbhajan over his tweet
Next Stories
1 Youth Olympics : हॉकीत भारतीय महिला संघाचा सलग दुसरा विजय
2 Youth Olympics : भारताची ‘सुवर्ण’संधी हुकली; मेहूली घोषला नेमबाजीत रौप्य
3 Youth Olympic : १५ वर्षाच्या जेरेमीने रचला इतिहास, पटकावले सुवर्णपदक
Just Now!
X