15 October 2019

News Flash

IND vs WI 4th ODI HIGHLIGHTS : रोहित शर्माचे दीडशतक, भारताची विंडीजवर २२४ धावांनी मात

India vs West indies 4th ODI Live Updates - मालिकेत २-१ने आघाडी

India vs West Indies 4th ODI Live Updates : विंडीजविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताने २२४ धावांनी विजय मिळवला. रोहित, रायडूची वादळी खेळी आणि गोलंदाजांचा अचूक मारा या बळावर भारताने सामना जिंकत मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. भारताच्या ३७७ धावांमध्ये रोहित शर्माने १६२ तर रायडूने १०० धावा ठोकल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजची फलंदाजी ढेपाळली आणि त्यांना १५३ धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून डावखुरा वेगवान गोलंदाज खलील अहमद याने सर्वाधिक ३ बळी टिपले.

नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी स्वीकारली. शिखर धवन फारशा धावा जमवू शकला नाही. ३८ धावांवर तो माघारी परतला. विराट कोहलीदेखील १६ धावांवर बाद झाला. मात्र त्यानंतर अंबाती रायडू आणि रोहित शर्मा यांनी २११ धावांची भागीदारी केली. रोहितने १३७ चेंडूत १६२ धावा केल्या. त्यात २० चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. रायडूने त्याला छान साथ देत ८१ चेंडूत १०० धावा केल्या. पण रोहित दीडशतकानंतर तर रायडू शतकानंतर लगेचच बाद झाला. धोनीदेखील २३ धावांत तंबूत परतला. अखेर शेवटच्या षटकात थोडीफार फटकेबाजी करत भारताने ३७७ धावांपर्यंत मजल मारली. केदारने ७ चेंडूत नाबाद १६ तर ४ चेंडूत नाबाद ७ धावा केल्या.

या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजची सुरुवात खराब झाली. २० या धावसंख्येवर विंडीजने हेमराज (१४), पॉवेल (४) आणि होप (०) असे ३ गडी गमावले. त्यानंतर ठराविक वेळेने विंडीजने गडी बाद होत राहिले. अनुभवी सॅम्युलस (१८), हेटमायर (१३), रोवमन पॉवेल (१), अॅलन (१०), नर्स (८), पॉल (१९) या फलंदाजांना खेळपट्टीवर जास्त काळ तग धरता आला नाही. केवळ कर्णधार होल्डरने संघर्षपूर्ण अर्धशतक केले. खलील अहमदने आणि कुलदीप यादवने ३-३, जाडेजा आणि भुवनेश्वर कुमार यांनी १-१ गडी टिपला.

 

लोकसत्ता समालोचन

Live Blog

Highlights

  • 17:24 (IST)

    मुंबईत रोहित-रायडूचे वादळ, विंडीजपुढे ३७८ धावांचे आव्हान

    चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताने निर्धारित ५० षटकात ५ बाद ३७७ धावा केल्या आणि विंडीजपुढे ३७८ धावांचे आव्हान ठेवले. रोहित शर्माचे दीडशतक आणि रायडूचे शतक याच्या बळावर भारताने या धावसंख्येपर्यंत मजल मारली.

  • 14:57 (IST)

    कर्णधार कोहली बाद, भारताला दुसरा धक्का

    सलग तीन सामन्यात शतक झळकावणारा भारतीय कर्णधार विराट कोहली आज मात्र मोठी खेळी करू शकला नाही. तो १६ धावांवर बाद झाला.

  • 13:11 (IST)

    नाणेफेक जिंकून भारताची प्रथम फलंदाजी

    तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात आव्हानाचा पाठलाग करताना पराभवाचा सामना करावा लागला, त्यामुळे भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

20:17 (IST)29 Oct 2018
कर्णधार होल्डरचे संघर्षपूर्ण अर्धशतक

कर्णधार होल्डरचे संघर्षपूर्ण अर्धशतक

20:00 (IST)29 Oct 2018
विंडीजचा नववा गडी बाद, किमो पॉल माघारी

विंडीजचा नववा गडी बाद, किमो पॉल माघारी

19:45 (IST)29 Oct 2018
अॅश्ले नर्स झेलबाद, विंडीजला आठवा धक्का

अॅश्ले नर्स झेलबाद, विंडीजला आठवा धक्का

19:26 (IST)29 Oct 2018
विंडीजचा सातवा गडी माघारी, फॅबियन अॅलन १० धावांवर बाद

विंडीजचा सातवा गडी माघारी, फॅबियन अॅलन १० धावांवर बाद

19:04 (IST)29 Oct 2018
अनुभवी सॅम्युअल्स झेलबाद, विंडीजचा सहावा गडी तंबूत

अनुभवी सॅम्युअल्स झेलबाद, विंडीजचा सहावा गडी तंबूत

18:46 (IST)29 Oct 2018
तडाखेबाज फलंदाज हेटमायर बाद, विंडीजचा चौथा गडी तंबूत

मालिकेत तडाखेबाज फलंदाज म्हणून उदयास आलेला फलंदाज शिमरॉन हेटमायर हा आजच्या सामन्यात स्वस्तात परतला. त्याला खलील अहमदने पायचीत केले. त्याने ११ चेंडूत १३ धावा केल्या.

18:24 (IST)29 Oct 2018
कायरन पॉवेल धावचीत, विंडीजची अवस्था ३ बाद २०

होपापाठोपाठ सलामीवीर कायरन पॉवेलदेखील धावचीत झाला. विराट कोहलीने धावत असताना स्टंपवर थेट चेंडू फेकला आणि पॉवेलला तंबूत धाडले.

18:21 (IST)29 Oct 2018
विंडीजचा दुसरा गडी बाद, होप शून्यावर धावचीत

गेल्या तीन सामन्यांमध्ये भारतासाठी डोकेदुखी ठरलेला शाई होप चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात बाद झाला. कुलदीप यादवने अचूक नेम मारून स्टंप उडवले आणि होप शून्यावर माघारी परतला.

18:17 (IST)29 Oct 2018
चंद्रपॉल हेमराज झेलबाद, विंडीजचा पहिला गडी बाद

सलामीवीर हेमराज चंद्रपॉलच्या रूपाने विंडीजने पहिला गडी गमावला. हेमराजने १ चौकार आणि १ षटकार ठोकत १४ धावा केल्या. पण भुवनेश्वर कुमारने टाकलेल्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर फटका मारून तो बाद झाला.

17:24 (IST)29 Oct 2018
मुंबईत रोहित-रायडूचे वादळ, विंडीजपुढे ३७८ धावांचे आव्हान

चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताने निर्धारित ५० षटकात ५ बाद ३७७ धावा केल्या आणि विंडीजपुढे ३७८ धावांचे आव्हान ठेवले. रोहित शर्माचे दीडशतक आणि रायडूचे शतक याच्या बळावर भारताने या धावसंख्येपर्यंत मजल मारली.

17:17 (IST)29 Oct 2018
धोनी पुन्हा अपयशी, २३ धावा करून तंबूत

धोनीच्या मैदानातील तंदुरुस्तीबाबत शंका नसली तरी फलंदाजीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यातच सलग तिसऱ्या सामन्यात तो भारतासाठी चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला. २३ धावा करून तो तंबूत परतला. या डावात त्याने २ चौकार लगावले.

17:10 (IST)29 Oct 2018
शतकानंतर रायडू धावचीत, भारताला चौथा धक्का

८१ चेंडूत १०० धावा करून अंबाती रायडू बाद झाला. चोरटी एकेरी धाव घेत असताना तो धावचीत झाला. यामुळे भारताला चौथा धक्का बसला.

17:03 (IST)29 Oct 2018
अंबाती रायडूचे तडाखेबाज शतक

भारताच्या मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायडू याने ८० चेंडूत तडाखेबाज खेळी करत शतक ठोकले. त्याने ८ चौकार आणि ४ षटकार खेचले.

16:50 (IST)29 Oct 2018
अखेर भारताची जमलेली जोडी फुटली, रोहित शर्मा माघारी

आक्रमक फटकेबाजी करण्याच्या नादात रोहित झेलबाद  होऊन माघारी परतला, भारताला तिसरा धक्का.

16:41 (IST)29 Oct 2018
रोहित शर्माचं दीडशतक, द्विशतकाकडे वाटचाल

विंडीजच्या गोलंदाजीचा समाचार घेत रोहितचं दीड शतक साजरं

16:15 (IST)29 Oct 2018
अंबाती रायडूचे झुंजार अर्धशतक

भारताच्या मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायडू याने झुंजार अर्धशतक ठोकले. या खेळीत त्याने ५ चौकार आणि १ षटकार खेचला.

16:01 (IST)29 Oct 2018
रोहित शर्माचे धमाकेदार शतक

सलामीवीर रोहित शर्माने अर्धशतकानंतर फटकेबाजी करत धमाकेदार शतक ठोकले. या खेळीत त्याने १३ चौकार आणि १ षटकार लगावला. हे त्याचे वन डे कारकिर्दीतील २१वे शतक ठोकले.

15:18 (IST)29 Oct 2018
सलामीवीर रोहित शर्माचे ६० चेंडूत अर्धशतक

पहिल्या सामन्यात दीडशतक ठोकणाऱ्या सलामीवीर रोहित शर्माला आजच्या सामन्यात पुन्हा सूर गवसला. त्याने ५ चौकार आणि १ षटकार लगावत ६० चेंडूत अर्धशतक झळकावले.

14:57 (IST)29 Oct 2018
कर्णधार कोहली बाद, भारताला दुसरा धक्का

सलग तीन सामन्यात शतक झळकावणारा भारतीय कर्णधार विराट कोहली आज मात्र मोठी खेळी करू शकला नाही. तो १६ धावांवर बाद झाला.

14:28 (IST)29 Oct 2018
सलामीवीर धवन बाद, भारताला पहिला धक्का

भारताचा सलामीवीर शिखर धवन झेलबाद झाला. किमो पॉल या फिरकीपटूच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. त्याने ४० चेंडूत ३२ धावा केल्या.

14:07 (IST)29 Oct 2018
भारताची झंझावाती सुरुवात, आठ षटकात अर्धशतकी मजल

भारतीय संघाने झंझावाती सुरुवात करून आठ षटकात अर्धशतकी मजल मारली. यात ५ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे.

13:34 (IST)29 Oct 2018
चौकाराने भारतीय डावाची सुरुवात

चौकाराने भारतीय डावाची सुरुवात

13:19 (IST)29 Oct 2018
पराभवानंतर भारतीय संघात दोन बदल

मधल्या फळीतील फलंदाजांच्या अपयशामुळे ऋषभ पंतच्या जागी केदार जाधवला संघांत संधी मिळाली आहे. याशिवाय, रवींद्र जाडेजाला युझवेन्द्र चहलच्या जागी संघात जागा मिळाली आहे.

13:11 (IST)29 Oct 2018
नाणेफेक जिंकून भारताची प्रथम फलंदाजी

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात आव्हानाचा पाठलाग करताना पराभवाचा सामना करावा लागला, त्यामुळे भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

First Published on October 29, 2018 1:09 pm

Web Title: ind vs wi west indies tour of india 2018 4th odi mumbai live updates online