IND vs WI : भारत विरुद्ध विंडीज दुसऱ्या कसोटीचा तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु आहे. या सामन्यात भारताचा पहिला डाव ३६७ धावांत संपुष्टात आला आणि उपहाराची विश्रांती घेण्यात आली. विंडीजचा कर्णधार जेसन होल्डर याने पाच बळी घेत भारताचा डाव लवकर संपवला.

काल दुसऱ्या दिवसअखेर भारताने ४ बाद ३०८ धावांपर्यंत मजल मारली होती. त्या धावसंख्येवरून आज खेळाला सुरूवात झाली. दुसऱ्या दिवसाच्या खेळात भारताने वर्चस्व राखले होते. पण आज तिसऱ्या दिवसाची सुरुवात भारतासाठी अतिशय खराब झाली. दिवसाच्या सुरुवातीच्या खेळात कर्णधार जेसन होल्डर याने एकाच षटकात खेळपट्टीवर स्थिरावलेला अजिंक्य रहाणे (८०) आणि रवींद्र जाडेजा (०) याला बाद केले.

विशेष म्हणजे हे षटक निर्धाव टाकण्यात त्याला यश आले. त्यानंतर ऋषभ पंत ९२ धावांवर बाद झाला. पाठोपाठ कुलदीप यादव (६) आणि उमेश यादव (२) धावांवर बाद झाला. पण अश्विनने तळाच्या फलंदाजांना हाताशी घेत भारताला साडेतीनशे पार मजल मारून दिली. अखेर गब्रीएलने अश्विनचा ३५ धावांवर त्रिफळा उडवला. भारताकडून पृथ्वी शॉ, विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि ऋषभ पंत यांनी चांगली कामगिरी केली.

कोहली वगळता तीनही खेळाडूंनी अर्धशतक ठोकले. कोहलीला मात्र अर्धशतक साजरे करता आले नाही. पण शेवटच्या सत्रात रहाणे आणि पंत केलेल्या कामगिरीच्या जोरावर भारताने त्रिशतकी मजल मारली. सध्या रहाणे ७५ धावांवर तर पंत ८५ धावांवर खेळत आहे. विंडिजकडून होल्डरने ५ तर गॅब्रियलने ३ आणि वॅरीकनने २ बळी टिपले.

चहापानाची वेळ होईपर्यंत भारताने ४ गड्यांच्या मोबदल्यात १७३ धावा केल्या. पहिल्या कसोटीत शतकी खेळी करणाऱ्या पृथ्वी शॉने या सामन्यातही आपली चमक दाखवली आणि केवळ ३९ चेंडूत अर्धशतक ठोकले. पण तो ७० धावांवर बाद झाला. पाठोपाठ पुजाराही तंबूत परतला. विराट आणि रहाणे जोडीने भारताचा डाव सावरला. पण विराटचे अर्धशतक हुकले. तो ४५ धावांवर बाद झाला.