29 September 2020

News Flash

तीन दिवसीय कसोटी सामना : बांगलादेश ‘अ’ संघावर एका डावाने विजय

अखेरचा दिवस खेळून काढण्यात अपयश आले आणि त्यांचा दुसरा डाव १५१ धावांवरच संपुष्टात आला.

भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय ‘अ’ संघ विजयी
भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय ‘अ’ संघाने बांगलादेश ‘अ’ संघावर तीन दिवसीय कसोटी सामन्यात एक डाव आणि ३२ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
बांगलादेशच्या पहिल्या डावातील २२८ धावांना प्रत्युत्तर देताना सलामीवीर शिखर धवनच्या दीडशतकाच्या जोरावर ५ बाद ४११ धावसंख्येवर भारताने डाव घोषित केला होता. तिसऱ्या दिवशी २ बाद ३६ वरून पुढे खेळताना बांगलादेशच्या फलंदाजांना अखेरचा दिवस खेळून काढण्यात अपयश आले आणि त्यांचा दुसरा डाव १५१ धावांवरच संपुष्टात आला.
भारताकडून वेगवान गोलंदाज ईश्वर पांडे आणि फिरकीपटू जयंत यादव यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला, तर अभिमन्यू मिथुनने दोन बळी घेत त्यांना सुरेख साथ दिली. बांगलादेशकडून कर्णधार मोमिनुल हक (५४) आणि लिटल दास (३८) यांना वगळता एकाही फलंदाजाला भारतीय गोलंदाजांचा प्रतिकार करता आला नाही आणि त्यामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
संक्षिप्त धावफलक
बांगलादेश ‘अ’ (पहिला डाव) : सर्व बाद २२८
भारत ‘अ’ (पहिला डाव) : ५ बाद ४११ (डाव घोषित)
बांगलादेश ‘अ’ (दुसरा डाव) : ३९.३ षटकांत सर्व बाद १५१. (मोमिनुल हक ५४; ईश्वर पांडे ३/२८, जयंत यादव ३/४८).
निकाल : भारत ‘अ’ एक डाव आणि ३२ धावांनी विजयी.

या सामन्याने मला फिटनेसची चाचपणी करण्यासाठी चांगली संधी दिली. गेल्या काही महिन्यांच्या पुनरागमनानंतर माझ्याकडून चांगली कामगिरी झाली. दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेपूर्वी झालेल्या कामगिरीमुळे माझा आत्मविश्वास उंचावला आहे. दुखापतीतून सावरलो असून मी यापुढेही तंदुरुस्त राहीन.
शिखर धवन, भारत ‘अ’ संघाचा कर्णधार

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2015 12:58 am

Web Title: india a cricket team defeat bangladesh a by an innings and 32 runs
Next Stories
1 अनुभवी खेळाडूंवरच महाराष्ट्राची भिस्त
2 राष्ट्रीय सबज्युनिअर बुद्धिबळ : पुण्याच्या आकांक्षा हगवणेला विजेतेपद
3 आशियाई एअरगन अजिंक्यपद स्पर्धा : आशी रस्तोगीला सुवर्ण
Just Now!
X