21 February 2019

News Flash

भरतच्या शतकामुळे भारत ‘अ’ संघाला आघाडी

चार दिवसीय क्रिकेट कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात १५९ धावांची मोठी आघाडी घेतली.

प्रातिनिधिक छायाचित्र

बेंगळूरु : यष्टिरक्षक फलंदाज श्रीकर भरत याने साकारलेल्या सुरेख शतकाच्या बळावर भारत ‘अ’ संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार दिवसीय क्रिकेट कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात १५९ धावांची मोठी आघाडी घेतली. भारताचा पहिला डाव ५०५ धावांवर संपुष्टात आला.

रविवारच्या ३ बाद २२३ धावांवरून पुढे खेळताना भारताने सुरेख खेळ केला. भरतने १२ चौकार व एका षटकारासह १०६ धावा ठोकल्या. कुलदीप यादव (५२) व कर्णधार श्रेयस अय्यर यांनी त्याला सुरेख साथ दिली. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया ‘अ’ ची २ बाद ३८ धावा अशी अवस्था झाली असून ते भारतापेक्षा अद्याप १२१ धावांनी पिछाडीवर आहेत.

संक्षिप्त धावफलक

भारत ‘अ’ (पहिला डाव) : सर्वबाद ५०५ (श्रीकर भरत १०६, अभिमन्यू ईश्वरन ८६; अ‍ॅश्टन अगर ३/४७).

ऑस्ट्रेलिया ‘अ’ (दुसरा डाव) : २ बाद ३८

First Published on September 11, 2018 1:31 am

Web Title: india a get lead against australia a in 4 days match