News Flash

भारत ‘अ’ संघाचे नेतृत्व उन्मुक्त चंदकडे

दिल्लीचा युवा फलंदाज उन्मुक्त चंदकडे ५ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या तिरंगी एकदिवसीय क्रिकेट स्पध्रेसाठी भारत ‘अ’ संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.

| August 2, 2015 02:26 am

दिल्लीचा युवा फलंदाज उन्मुक्त चंदकडे ५ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या तिरंगी एकदिवसीय क्रिकेट स्पध्रेसाठी भारत ‘अ’ संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. कर्नाटकचा फलंदाज करुण नायर उपकर्णधारपद सांभाळणार आहे. ऑस्ट्रेलिया ‘अ’ आणि दक्षिण आफ्रिका ‘अ’ हे दोन अन्य संघ या स्पध्रेत खेळणार आहेत. सर्व सामने एम. ए. चिदम्बरम स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत. याचप्रमाणे १८ ऑगस्टपासून वायानाद येथे सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारत ‘अ’ संघाचे नेतृत्व अंबाती रायुडूकडे देण्यात आले आहे.
भारत ‘अ’ संघ पुढीलप्रमाणे –
तिरंगी स्पध्रेसाठी : उन्मुक्त चंद (कर्णधार), करुण नायर (उपकर्णधार), मयांक अगरवाल, मनीष पांडे, केदार जाधव, संजू सॅमसन, अक्षर पटेल, परवेझ रसूल, कर्ण शर्मा, धवल कुलकर्णी, संदीप शर्मा, रुश कलारिया, मनदीप सिंग, गुरकिराट सिंग मान, रिषी धवन.
कसोटी मालिका : अंबाती रायुडू (कर्णधार), करुण नायर, अभिनव मुकुंद, अंकुश बेन्स, श्रेयस अय्यर, बाबा अपराजित, विजय शंकर, जयंत यादव, अक्षर पटेल, कर्ण शर्मा, अभिमन्यू मिथुन, शार्दूल ठाकूर, ईश्वर पांडे, शेल्डन जॅक्सन, जीवनज्योत सिंग.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2015 2:26 am

Web Title: india a lead by unmuktchand
टॅग : India A
Next Stories
1 सानिया मिर्झाची ‘खेलरत्न’साठी शिफारस
2 नेहमीच जबाबदारीने खेळतो कोहली
3 कोहलीने आक्रमकच राहायला हवे -द्रविड
Just Now!
X