रणजी विजेत्या मुंबई संघातील अष्टपैलू खेळाडू अभिषेक नायरचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सराव सामन्यासाठी भारतीय ‘अ’ संघात समावेश करण्यात आला आहे.‘‘चेन्नईमध्ये १६ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या तीन दिवसीय सराव सामन्यासाठी भारतीय संघात अभिषेक नायरचा समावेश करण्यात आला आहे,’’ असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव संजय जगदाळे यांनी सांगितले.
मुंबईला ४०वे ऐतिहासिक रणजी विजेतेपद मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या नायरने ९९.६०च्या सरासरीने ९६६ धावा केल्या आणि १९ बळी घेतले. यंदाच्या रणजी हंगामात पाच शतके झळकावणारा पंजाबचा सलामीवीर जिवनज्योत सिंगचाही या संघात समावेश करण्यात आला आहे.

भारतीय ‘अ’ संघ :
शिखर धवल (कर्णधार), जिवनज्योत सिंग, रोहित शर्मा, मनोज तिवारी, अजिंक्य रहाणे, सी. गौतम, राकेश ध्रुव, जलाज सक्सेना, मनप्रीत गोनी, विनय कुमार, धवल कुलकर्णी, अशोक मनेरिया आणि अभिषेक नायर.