भारत-आफ्रिका क्रिकेट मालिका
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत १-३ अशा पिछाडीवर असणारा भारतीय महिला संघ बुधवारी प्रतिष्ठा राखण्याच्या इराद्याने पाचव्या सामन्यासाठी मैदानात उतरेल.
मिताली राजच्या नेतृत्वाखालील भारताने फक्त दुसऱ्या लढतीत नऊ गडी राखून विजय मिळवला. परंतु अन्य तीन सामन्यांत आफ्रिकेने सहज विजय मिळवला. त्यामुळे २० मार्चपासून रंगणाऱ्या ट्वेन्टी-२० मालिकेपूर्वी आत्मविश्वास कमावण्याची भारताला ही नामी संधी आहे.
धडाकेबाज सलामीवीर शफाली वर्मा, वेगवान गोलंदाज शिखा पांडे यांना संघात स्थान न देण्याचा निर्णय भारताला महागात पडला. त्याशिवाय फिरकीपटू पूनम यादव (चार सामन्यांत शून्य बळी), राजेश्वरी गायकवाड (पाच बळी) यांचे अपयश संघाच्या पराभवासाठी कारणीभूत ठरले. फलंदाजीत स्मृती मानधना, दीप्ती शर्मा यांना कामगिरीत सातत्य राखण्यात अपयश आले आहे.
* सामन्याची वेळ : सकाळी ९ वा.
* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 17, 2021 12:11 am