ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या विश्व अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेसाठी भारतीय बॉक्सर्सना सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली असली तरी भारतीय बॉक्सिंग महासंघाने नोव्हेंबपर्यंत निवडणूका घेण्याचे आदेश आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाकडून (एआयबीए) देण्यात आले आहेत.
‘‘एआयबीएच्या घटनेनुसार, आयबीएफने तीन महिन्यांच्या आत पुनर्निवडणूक घ्यावी. तोपर्यंत त्यांच्यावर असलेली तात्पुरती बंदी कायम राहील. ,’’ असे एआयबीएचे संचालक सेबॅस्टियन गिलोट यांनी सांगितले.