News Flash

भारत व विंडीजचे खेळाडू दलाई लामांना भेटणार

भारत व वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू तिबेटियन धर्मगुरू दलाई लामा यांना भेटणार आहेत. या दोन संघांमध्ये १७ ऑक्टोबर रोजी एक दिवसाचा सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी

| October 14, 2014 01:14 am

भारत व वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू तिबेटियन धर्मगुरू दलाई लामा यांना भेटणार आहेत. या दोन संघांमध्ये १७ ऑक्टोबर रोजी एक दिवसाचा सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही संघांमधील खेळाडू लामा यांचा आशीर्वाद घेणार आहेत.
हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेचे प्रवक्ते संजय शर्मा यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले,की विशाखापट्टणम येथे मंगळवारी होणारा सामना चक्रीवादळ व पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही संघांमधील खेळाडू लवकरच धरमशाला येथे येणार आहेत. दोन्ही संघांमधील खेळाडूंना मैदानावरच सामना सुरू होण्यापूर्वी लामा भेटणार आहेत व त्यांना शुभेच्छा देतील. येथे एक दिवसाचा हा दुसरा सामना होत आहे. यापूर्वी २०१३ मध्ये भारत व इंग्लंड यांच्यात एक दिवसाचा सामना आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी काही तांत्रिक कारणामुळे खेळाडूंची लामा यांच्याशी भेट होऊ शकली नव्हती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2014 1:14 am

Web Title: india and west indies players to meet dalai lama
टॅग : Dalai Lama
Next Stories
1 इंग्लंडची भारतावर मात
2 इंडियन संगीत लीगची मेजवानी
3 कोलकाताचा मुंबईवर विजय
Just Now!
X