25 October 2020

News Flash

वेस्ट इंडिजविरुद्ध सराव सामन्यासाठी अध्यक्षीय संघाची घोषणा, करुण नायरकडे नेतृत्व

पृथ्वी शॉ-श्रेयस अय्यरलाही संघात स्थान

करुण नायर अध्यक्षीय संघाचा कर्णधार

आगामी वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेआधी होणाऱ्या सराव सामन्यासाठी बीसीसीआयने आज अध्यक्षीय संघाची घोषणा केली आहे. १३ सदस्यीय संघाचं नेतृत्व करुण नायरकडे देण्यात आलेलं आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या पृथ्वी शॉ, हनुमा विहारी, मयांक अग्रवाल या खेळाडूंना अध्यक्षीय संघात जागा देण्यात आलेली आहे. ४ ऑक्टोबरपासून वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात भारत २ कसोटी सामने खेळणार आहे.

असा असेल विंडिजविरुद्ध भारताचा अध्यक्षीय संघ –

करुण नायर (कर्णधार), मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, हनुमा विहारी, श्रेयस अय्यर, अंकित बावने, इशान किशन (यष्टीरक्षक), जलल सक्सेना, सौरभ कुमार, बसिल थम्पी, आवेश खान, के. विघ्नेश, इशान पोरेल

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2018 10:05 pm

Web Title: india announce board presidents xi squad for windies warm up match
Next Stories
1 China Open 2018 : सिंधू, किदम्बी श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत पराभूत, भारताचं आव्हान संपुष्टात
2 विजय हजारे चषक – मुंबईची कर्नाटकवर मात, कर्णधार अजिंक्य रहाणेचं शतक
3 शून्य गुण मिळूनही विराट कोहलीला खेलरत्न पुरस्कार, जाणून घ्या काय आहेत निकष?
Just Now!
X