आगामी जागतिक बॅटमिंटन स्पर्धेसाठी भारताच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. ऑगस्ट २१ ते २७ दरम्यान स्कॉटलंडच्या ग्लासगो शहरात ही स्पर्धा रंगणार आहे. रिओ ऑलिम्पीकमधील रौप्यपदक विजेती पी.व्ही.सिंधू आणि जागतिक क्रमवारीत ८ व्या क्रमांकावर असलेल्या श्रीकांत किदम्बी यांच्यावर या स्पर्धेत मोठी जबाबदारी असणार आहे.

श्रीकांत व्यतिरीक्त अजय जयराम, बी. साई प्रणीत यांनाही संघात स्थान मिळालं आहे. याव्यतिरीक्त राष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपद मिळवणारे रितुपर्ण दास आणि तन्वी लाड यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे.

या स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघावर एक नजर टाकणार आहोत –

पुरुष एकेरी – श्रीकांत किदम्बी, अजय जयराम, बी.साई प्रणीत, समीर वर्मा

महिला एकेरी – पी.व्ही.सिंधू, सायना नेहवाल, रितुपर्ण दास, तन्वी लाड

पुरुष दुहेरी – मनु अत्री आणि सुमित रेड्डी, सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी, श्लोक रामचंद्रन आणि एम.आर.अर्जुन

महिला दुहेरी – आश्विनी पुनप्पा आणि एन.सिकी रेड्डी, संजना संतोष आणि आर्थी सारा सुनील, मेघना जक्कमपुडी आणि पुर्विशा एस.राम

मिश्र दुहेरी – प्रणव चोप्रा आणि एन.सिकी रेड्डी, बी. सुमित रेड्डी आणि आश्विनी पुनप्पा, सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि के. मनिषा

प्रशिक्षक – पुलेला गोपीचंद, विमल कुमार, मुलयो हांदोयो, टॅन किम हर, ज्वाला गुट्टा, प्रज्ञा गद्रे, हरिवान

सहाय्यक – अरविंद निगम, सी. किरण, जॉन्सन, श्रीनीवास राव

अवश्य वाचा – भारतीय बॅडमिंटनपटूंची धडाकेबाज कामगिरी, चिनी ड्रॅगनला टाकलं मागे