News Flash

भारत ‘ब’ संघ अंतिम फेरीत

भारत ‘ब’ संघाने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद २३१ धावा केल्या. यात विहारीने ९४ चेंडूंत सहा चौकारांसह ७६ धावा केल्या.

भारत ‘ब’ संघ अंतिम फेरीत
(संग्रहित छायाचित्र)

देवधर करंडक क्रिकेट स्पर्धा

हनुमा विहारीच्या झुंजार अर्धशतकी खेळीच्या बळावर भारत ‘ब’ संघाने भारत ‘क’ संघावर ३० धावांनी विजय मिळवून देवधर करंडक क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.

भारत ‘ब’ संघाने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद २३१ धावा केल्या. यात विहारीने ९४ चेंडूंत सहा चौकारांसह ७६ धावा केल्या. त्यानंतर भारत ‘क’ संघाचा डाव ४८.२ षटकांत २०१ धावांवर गुंडाळला. कृष्णप्पा गौतम (१० षटकांत ४० धावांत ३ बळी) आणि मनोज तिवारी (८ षटकांत ४४ धावांत ३ बळी) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारत ‘क’ संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे झगडताना आढळला. त्याने ६१ चेंडूंत फक्त ३२ धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक

भारत ‘ब’ : ५० षटकांत ९ बाद २३१ (हनुमा विहारी ७६, अंकुश बैन्स २५; रजनीश गुरबानी ३/३८) विजयी वि. भारत ‘क’ : ४८.२ षटकांत सर्व बाद २०१ (सूर्यकुमार यादव ३९; के. गौतम ३/४०, मनोज तिवारी ३/४४)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2018 2:46 am

Web Title: india b team in the final round
Next Stories
1 मितालीच्या विक्रमी शतकामुळे भारत ‘अ’ संघाचा मालिका विजय
2 रितू मलिककडून पदकाची आशा; साक्षी, फोगट पराभूत
3 आनंद, विदितचे शानदार विजय
Just Now!
X