28 September 2020

News Flash

मराठमोळ्या स्मृती मंधानाला Forbesच्या यादीत स्थान

फोर्ब्सकडून '३० अंडर ३०' ही यादी जाहीर करण्यात आली

ICC च्या महिला फलंदाजांच्या जागितक क्रमवारीत नुकतेच अव्वल स्थान पटकावणाऱ्या भारताच्या स्मृती मंधानला मानाच्या ‘फोर्ब्स’च्या यादीत स्थान मिळाले आहे. फोर्ब्सकडून भारतातील ‘३० अंडर ३०’ अशी एक यादी तयार करण्यात आली आहे. या यादीत स्मृतीला स्थान देण्यात आले आहे. तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक कमावणारी हिमा दास, राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा नीरज चोप्रा यांचा यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

फोर्ब्स इंडियाच्या ’30 अंडर 30’चे हे सहावे वर्ष आहे. या यादीमध्ये खेळाडूबरोबर मनोरंजन क्षेत्र, मार्केटिंग अशा एकूण १६ क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव करण्यात आला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत भारताने २-१ अशा विजय मिळवला आणि स्मृतीने मालिकावीराचा पुरस्कार जिंकला. स्मृतीने २०१८ वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत १५ वन-डे सामन्यांत दोन शतकं आणि ८ अर्धशतकं झळकावली. ICCच्या क्रमवारीत स्मृतीने (७५१) ७० गुणांच्या आघाडीसह ऑस्ट्रेलियाच्या एलिसे पेरीला मागे टाकले आहे. ऑस्ट्रेलियाचीच मेग लॅनिंग ७६ गुणांच्या पिछाडीसह तिसऱ्या स्थानावर आहे.

या यादीसाठी पहिल्यांदाच उद्योग, उर्जा, मार्केटिंग, मीडिया, कृषी या क्षेत्रांचाही समावेश करण्यात आला आहे. ‘फोर्ब्स’च्या या यादीमध्ये प्रत्येक देशातील ३० वर्षांखालील तरुण-तरुणींचा सन्मान केला जातो. ३० वर्षांखालील ज्या व्यक्तींनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे, त्यांना या यादीमध्ये स्थान दिले जाते. या यादीत तरुण युट्युबर प्राजक्ता कोळी, गायिका मेघना मिश्रा यांनाही स्थान देण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2019 5:39 pm

Web Title: india batsman smriti mandhana in forbes list of 30 under 30
Next Stories
1 गौतमने दिलं ‘गंभीर’ विषयावर स्पष्टीकरण, म्हणाला…
2 Ranji Trophy : सलग दुसऱ्यांदा विदर्भला विजेतेपदाची संधी
3 भारतच विश्वविजेतेपदाचा प्रबळ दावेदार – सचिन
Just Now!
X