21 October 2018

News Flash

दृष्टीहिन क्रिकेट विश्वचषक – भारताची पाकिस्तानवर ७ गडी राखून मात

कर्णधार अजय रेड्डीचा अष्टपैलू खेळ

भारतीय संघाचे संग्रहीत छायाचित्र

माजी विश्वविजेत्या भारताने दृष्टीहिनांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानवर मात केली आहे. दुबई येथे खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर ७ गडी राखून मात केली.

सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानच्या संघाने, ४० षटकांच्या मोबदल्यात ८ गडी गमावून २८२ धावा केल्या. पाकिस्तानकडून मोहम्मद जमील आणि कर्णधार निसार अली यांनी तिसऱ्या विकेटसाठी १३७ धावांची भागीदारी केली. यावेळी भारताच्या अजय रेड्डीने ६३ धावांवर निसार अलीला माघारी धाडलं तर मोहम्मद जमील ९४ धावांवर नाबाद राहिला.

प्रत्युत्तरादाखल भारताने पाकिस्तानने दिलेलं आव्हान ३४.५ षटकांमध्ये सहज पार केलं. भारताकडून हरयाणाच्या दिपक मलिकने ७१ चेंडूत ७९ धावांची खेळी केली. तर व्यंकटेशने ६४ आणि कर्णधार अजय रेड्डीने ४७ धावा काढल्या. बांगलादेश आणि नेपाळवर मात करत पाकिस्तानचा संघ अंतिम फेरीत दाखल झाला होता. मात्र भारतीय संघापुढे पाकिस्तानची डाळ शिजू शकली नाही.

First Published on January 12, 2018 10:27 pm

Web Title: india beat pakistan by 7 wickets in blind cricket world cup