भारताने अखेरच्या साखळी सामन्यात एकमेव गोलच्या बळावर रशियाचा पाडाव केला आणि जागतिक हॉकी लीग स्पध्रेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. मेजर ध्यानचंद स्टेडियमवरील या दुसऱ्या फेरीच्या सामन्यात राणी रामपालने हा महत्त्वपूर्ण गोल नोंदविला.
भारताशिवाय जपानसुद्धा तिसऱ्या फेरीसाठी पात्र ठरला आहे. पुढील वर्षी नेदरलँड्समधील हॅग येथे होणाऱ्या विश्वचषक स्पध्रेसाठी पात्रतेचा दर्जा या स्पध्रेला देण्यात आला आहे.
भारत आणि जपान या दोन्ही संघांनी पाच सामन्यांतून प्रत्येकी ९ गुण कमवले. परंतु भारताच्या खात्यावर अधिक विजय जमा असल्यामुळे तालिकेतील अव्वल स्थान त्यांनी प्राप्त केले.