फिरकीपटू दीपक हुडा व सौरभ कुमार यांनी केलेल्या सुरेख गोलंदाजीमुळे इंडिया ब्लू संघाने इंडिया रेड संघाचा दुसरा डाव अवघ्या १७२ धावांत संपुष्टात आणत दुलीप करंडकावर नाव कोरले. त्यांनी इंडिया रेड संघाचा तब्बल एक डाव व १८७ धावांनी धुव्वा उडवत विजेतेपद मिळवले. पहिल्या डावातील शतकवीर निखिल गांगटाला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

गुरुवारच्या ५ बाद १२८ धावांवरून पुढे खेळताना इंडिया ब्लूच्या फिरकीपटूंनी इंडिया रेड संघाच्या फलंदाजांना अक्षरश: नाचवले. अभिनव मुकुंद (४६) व ईशान किशन (३०) वगळता अन्य एकाही फलंदाजाला त्यांचा प्रतिकार करता आला नाही.

संक्षिप्त धावफलक

इंडिया ब्लू (पहिला डाव) : सर्व बाद ५४१, इंडिया रेड (पहिला डाव) : सर्व बाद १८२, इंडिया रेड (दुसरा डाव) : ३८.४ षटकांत सर्व बाद १७२ (अभिनव मुकुंद ४२; दीपक हुडा ५/५६, सौरभ कुमार ५/५१).