News Flash

ICC Women’s T20I Ranking : भारतीय महिलांची तिसऱ्या स्थानावर झेप

न्यूझीलंडच्या संघाला टाकलं मागे

भारतीय महिला क्रिकेट संघाने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रमवारीत न्यूझीलंडला मागे टाकत तिसरं स्थान पटकावलं आहे. आयसीसीने शुक्रवारी महिला क्रिकेट संघांसाठी नवी क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या संघाने आपलं पहिलं आणि दुसरं स्थान कायम राखलं आहे. ऑस्ट्रेलियन महिला संघाच्या खात्यात २९१ तर इंग्लंड महिला संघाच्या खात्यात २८० गुण जमा आहेत.

फेब्रुवारीत ऑस्ट्रेलियात झालेल्या महिला टी-२० विश्वचषकाची अंतिम फेरी गाठणारा भारतीय महिला संघ २७० गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. न्यूझीलंडचा संघ आणि भारताचा संघ यांच्यात फक्त एका गुणाचा फरक आहे. भारतीय महिला संघाच्या खेळाडू सध्या युएईत महिला आयपीएल स्पर्धा खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. ४ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत बीसीसीआय युएईत ३ संघांमध्ये ही स्पर्धा खेळवणार असल्याचं समजतंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 2, 2020 4:26 pm

Web Title: india climb to third in icc womens t20 team rankings psd 91
Next Stories
1 डोनाल्ड ट्रम्पना करोनाची लागण, सेहवाग म्हणतो…गो करोना गो !
2 फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा : प्लिस्कोव्हा पराभूत;हॅलेपची आगेकूच
3 किमिचच्या निर्णायक गोलमुळे बायर्न म्युनिकचे अष्टक
Just Now!
X