News Flash

‘निसर्ग’ चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या अलिबागकरांना पृथ्वीची मदत

घरांची डागडुजी करण्यासाठी केली आर्थिक मदत

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टी भागाला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसला. महाराष्ट्रात अलिबाग, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागातील अनेक गावं या चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडली. कोकणात अनेक गावांमध्ये नागरिकांची घरं, फळबागा या वादळामुळे उद्धस्त झाल्या. मुंबईपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या अलिबागमध्येही निसर्ग चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झालेलं पहायला मिळालं. भारतीय संघाचा क्रिकेटपटू आणि मुंबईकर पृथ्वी शॉ सध्या अलिबागमध्ये अडकला आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात नुकसान झालेल्या लोकांना त्यांचं घर पुन्हा उभं करण्यासाठी पृथ्वी शॉने आर्थिक मदत केली आहे. Mid Day वृत्तपत्राने यासंदर्भातली बातमी दिली आहे.

पृथ्वी सध्या शिवसेना नेते संजय पोतनिस यांच्या अलिबागमधील धोकावडे गावातील फार्महाऊसमध्ये अडकला आहे. पृथ्वीसोबत संजय पोतनिस यांचा मुलगा यशही आहे. “लॉकडाउनमध्ये माझा मुलगा आणि पृथ्वी फार्महाऊसमध्ये अडकला आहे. चक्रीवादळामध्ये माझ्या फार्महाऊसचंही थोडं नुकसान झालं. हे चक्रीवादळ खूप भयानक होतं. अनेक घरांचं यात नुकसान झालं, काहींच्या घरावरची छपरं, पत्रे उडून गेले. गावकऱ्यांचं झालेलं नुकसान पाहून यश आणि पृथ्वीने त्यांची मदत करायचं ठरवलं. पृथ्वीने काही जणांच्या घरावरची छपरं चढवण्यास मदत केली, काही जणांना त्याने आपलं घर पुन्हा उभं करण्यासाठी आर्थिक मदतही केली.” पोतनिस यांनी मिड-डे वृत्तपत्राशी बोलताना माहिती दिली.

लॉकडाउन काळात सध्या सर्व भारतीय क्रिकेटपटू घरात राहून आपल्या परिवारासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करत आहेत. पृथ्वी सध्या अलिबागमध्ये अडकला असला तरीही तो स्वतःचा फिटनेस कायम राखण्याकडे भर देतो आहे. नवीन वर्षात न्यूझीलंड दौऱ्यात पृथ्वीला भारतीय संघात संधी मिळाली होती, परंतू त्याला म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. यानंतर पृथ्वी आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणार होता. परंतू करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आयपीएलचा तेरावा हंगाम बीसीसीआयने पुढील सचूना मिळेपर्यंत स्थगित केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2020 2:10 pm

Web Title: india cricketer prithvi shaw helps villagers to rebuild their homes provides financial assistance to needy psd 91
Next Stories
1 Flashback : टीम इंडिया – १७/५… मग कपिल देवने ठोकल्या नाबाद १७५ धावा
2 सचिन २००७ साली करणार होता क्रिकेटला रामराम !
3 सात वर्षानंतर टीम इंडियाच्या खेळाडूचं क्रिकेटच्या मैदानावर ‘कमबॅक’
Just Now!
X