News Flash

न्यूझीलंड हॉकी दौरा : भारतीय पुरुष हॉकी संघाची न्यूझीलंडमध्ये विजयी सलामी

भारतीय पुरुष हॉकी संघाने न्यूझीलंडच्या दौऱ्यात विजयी सलामी केली.

भारतीय पुरुष हॉकी संघाने न्यूझीलंडच्या दौऱ्यात विजयी सलामी केली. त्यांनी न्यूझीलंड ‘अ’ संघावर ३-१ अशी मात केली. भारताकडून आकाशदीपसिंग, रमणदीपसिंग व निक्किन थिमय्या यांनी गोल केले.

उत्कंठापूर्ण सामन्यात तिसऱ्या मिनिटाला भारताला गोल करण्याची संधी मिळाली. रमणदीपने दिलेल्या पासवर आकाशदीप याने गोल करीत संघाचे खाते उघडले. २०व्या मिनिटाला पुन्हा भारतीय खेळाडूंनी जोरदार चाल केली. रमणदीपने प्रतिस्पर्धी संघाच्या बचावफळीतील खेळाडूंना चकवत अप्रतिम गोल केला व भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर सहा मिनिटांनी थिमय्याने गुरजिंदरसिंगने दिलेल्या पासचा फायदा घेत गोल केला.

तिसऱ्या डावात न्यूझीलंडच्या खेळाडूंनी एक गोल करत सामन्यात उत्सुकता निर्माण केली. त्यांनी पेनल्टी कॉर्नरचा फायदा घेत हा गोल केला. त्यानंतर त्यांनी केलेल्या चाली भारतीय खेळाडूंनी रोखण्यात यश मिळविले. याच दोन संघांमध्ये शनिवारी कसोटी सामना होणार आहे. भारताची न्यूझीलंडच्या वरिष्ठ संघाबरोबर ६ ऑक्टोबर रोजी पहिला सामना होईल. त्यानंतर ७, ९ व ११ ऑक्टोबर रोजी सामने होणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2015 1:49 am

Web Title: india defeat new zealand a in hockey series opener
टॅग : India Hockey Team
Next Stories
1 रिकी भुईचे शतक
2 महाराष्ट्राने हरयाणाला ३३५ धावांवर रोखले
3 आफ्रिकेच्या पाहुणचारासाठी भारत सज्ज
Just Now!
X