News Flash

IND vs ENG : तिकिटांच्या रिफंडसाठी ‘अशी’ आहे प्रक्रिया

तिकिटांची पूर्ण रक्कम परत मिळणार

करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिकेचे शेवटचे तीन सामने प्रेक्षकांशिवाय खेळवण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या सामन्यांसाठी  विक्री केलेल्या तिकिटांचे पैसेही परत केले जाणार आहेत. याबाबतची प्रक्रिया आज बुधवारी दुपारी तीनपासून सुरू झाली आहे. गुजरात क्रिकेट असोसिएशनने (जीसीए) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी (बीसीसीआय) चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे.

18 आणि 20 मार्च रोजी भारत आणि इंग्लंडमध्ये मालिकेचे शेवटचे दोन टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. तर, 16 मार्चला झालेला तिसरा टी-20 सामनाही प्रेक्षकांशिवाय पार पडला. सुरुवातीला या मालिकेसाठी स्टेडियम क्षमतेच्या 50 टक्के प्रेक्षकांना सामना पाहण्याची परवानगी होती. पण गुजरातमधील करोनाच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर जीसीए आणि बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे.

अशी असेल प्रक्रिया

  • तिकिटांची पूर्ण रक्कम परत मिळणार.
  • ऑनलाइन तिकिटे घेणाऱ्यांसाठी परतावा प्रक्रिया 17 मार्चला दुपारी 3 वाजता सुरू होईल. ही प्रक्रिया 22 मार्च दुपारी 4 पर्यंत असेल. ज्या अकाउंटवरून तिकिटे बुक केली असतील त्या अकाउंटवर तिकिटांचा परतावा पाठवला जाईल.
  • ऑफलाइन तिकिटे घेणाऱ्यांसाठी परतावा प्रक्रिया 18 मार्चला दुपारी 3 वाजता सुरू होईल. ही प्रक्रिया 22 मार्च दुपारी 4 पर्यंत असेल. नरेंद्र मोदी स्टेडियमच्या गेट क्रमांक 1 जवळ असलेल्या बॉक्स ऑफिस येथे तिकिटांचा परतावा मिळेल.
  • ऑफलाइन तिकिटांचा परतावा घेण्यासाठी येणाऱ्यांना करोनासंबंधित नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.

देशात करोनाचा वाढतोय धोका

महाराष्ट्रासह देशातील काही राज्यात करोनाचा प्रसार वाढला आहे. गुजरातमध्येही करोनाने डोके वर काढले असून, त्याचा फटका भारत आणि इंग्लंड यांच्या सुरू असलेल्या टी-२० मालिकेला बसला आहे. राज्यात दिवसागणिक वाढत असलेल्या रुग्णसंख्येचे गांभीर्य लक्षात घेत गुजरात क्रिकेट मंडळाने भारत-इंग्लंड यांच्यातील उर्वरित टी-२० सामने प्रेक्षकांविना खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2021 2:05 pm

Web Title: india england t20 series ticket refund process will start from today adn 96
टॅग : Ind Vs Eng
Next Stories
1 पाचव्या वनडेतही भारताचा पराभव, दक्षिण आफ्रिकेचा 4-1ने मालिकाविजय
2 ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेपूर्वी भारताच्या तीन खेळाडूंना करोनाची लागण!
3 बिली जीन किंग कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा
Just Now!
X