तिसरी कसोटी आजपासून; कर्णधार कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा

लॉडर्सच्या दुसऱ्या कसोटीत झगडणाऱ्या इंग्लंड संघावर ऐतिहासिक विजय संपादन केल्यानंतर बुधवारपासून लीड्सला सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीतही वर्चस्व गाजवून भक्कम आघाडी मिळवण्याचा निर्धार भारतीय क्रि के ट संघाने केला आहे. प्रदीर्घ काळ मोठ्या खेळीसाठी प्रतीक्षेत असलेला भारतीय कर्णधार विराट कोहली लीड्सवर छाप पाडण्यासाठी उत्सुक आहे.

नोव्हेंबर २०१९मध्ये कोहलीने अखेरचे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले होते. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत तो दोनदा चाळिशीत बाद झाला आहे. परंतु आधुनिक क्रिकेटमधील या अव्वल फलंदाजांकडून अपेक्षाही तितक्याच उंचावल्याने टीका होत आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यांत उजव्या यष्टीबाहेरील सापळ्यात कोहली सापडला. त्यामुळे त्याला आपल्या तंत्रात सुधारणा करावी लागणार आहे. अन्यथा तिसऱ्या कसोटीत फलंदाजी करणे अधिक आव्हानात्मक ठरेल. भारतीय संघ २००२मध्ये हेडिंग्लेवर अखेरचा सामना खेळला होता. त्या सामन्यात भारताने एक डाव आणि ४६ धावांनी संस्मरणीय विजय मिळवला होता. त्याची पुनरावृत्ती करण्यासाठी भारत उत्सुक आहे.

साकिबला पदार्पणाची संधी

लॉर्ड्स कसोटीत वेगवान माऱ्याने भारतीय फलंदाजांना त्रस्त करणाऱ्या मार्क वूडने दुखापतीमुळे माघार घेतल्याने इंग्लंडच्या अडचणीत भर पडली आहे. त्यामुळे साकिब मेहमूदला पदार्पणाची संधी मिळू शकते. अनुभवी जेम्स अँडरसन तंदुरुस्त असल्याची ग्वाही रूटने दिली आहे. लॉर्ड्सवर उभय संघांमधील खेळाडूंमध्ये काही वाद उद्भवले. लीड्सवर असे अनावश्यक वाद टाळू, असे रूटने म्हटले आहे.

रोहित-राहुल लयीत

रोहित शर्मा आणि के. एल. राहुल या सलामीवीरांची कामगिरी भारताच्या धावसंख्येसाठी प्रेरक ठरत आहे. राहुलचा प्रत्येक डावागणिक आत्मविश्वास उंचावत आहे. रोहितसुद्धा लयीत आहे, परंतु चुकीच्या चेंडूवर पूलचा फटका खेळल्याने मालिकेत त्याचा दोनदा घात केला आहे चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांचे अपयश भारतासाठी चिंताजनक ठरत होते. परंतु लॉडर्समध्ये यांनी जवळपास ५० षटके किल्ला लढवून टीकाकारांना चोख उत्तर दिले आहे.

वेगवान चौकडीच कायम

हेडिंग्लेमधील वातावरण हे थंड असल्यामुळे वेगवान गोलंदाजांचेच खेळपट्टीवर वर्चस्व दिसून येईल. या परिस्थितीत भारत वेगवान चौकडीचीच रणनीती आखून, पुन्हा रविचंद्रन अश्विनला विश्रांती देईल. शार्दूल ठाकूर दुखापतीतून सावरला असला तरी कोहली लॉडर्सवरील विजयी वेगवान माऱ्यात बदल करणार नाही. पहिल्या कसोटीत वगळलेल्या इशांत शर्माने लॉर्ड्सवर लक्ष वेधले. त्यामुळे अनुभवी इशांतला शार्दूलपेक्षा प्राधान्य दिले जाईल.

 

मलानवर फलंदाजीची भिस्त

पहिल्या दोन्ही कसोटी सामन्यांत इंग्लंडच्या फलंदाजीच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. कर्णधार जो रूट मात्र खेळपट्टीवर जिद्दीने डाव सावरता दिसून आला आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील धडाकेबाज फलंदाज डेव्हिड मलानवर आता इंग्लंडच्या फलंदाजीची भिस्त असेल. तीन वर्षांपूर्वी अखेरचा कसोटी सामना खेळलेल्या मलानकडे प्रथम श्रेणी क्रिकेटचा पुरेसा अनुभव आहे.

साकिबला पदार्पणाची संधी

लॉर्ड्स कसोटीत वेगवान माऱ्याने भारतीय फलंदाजांना त्रस्त करणाऱ्या मार्क वूडने दुखापतीमुळे माघार घेतल्याने इंग्लंडच्या अडचणीत भर पडली आहे. त्यामुळे साकिब मेहमूदला पदार्पणाची संधी मिळू शकते. अनुभवी जेम्स अँडरसन तंदुरुस्त असल्याची ग्वाही रूटने दिली आहे. लॉर्ड्सवर उभय संघांमधील खेळाडूंमध्ये काही वाद उद्भवले. लीड्सवर असे अनावश्यक वाद टाळू, असे रूटने म्हटले आहे.

बुमराची गोलंदाजी पाहून भांबावलो -अँडरसन

दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात जसप्रीत बुमराची गोलंदाजी पाहून काही काळ आपण भांबावल्याची कबुली इंग्लंडचा गोलंदाज जेम्स अँडरसनने दिली. ह्यह्यबुमराची गोलंदाजी पाहून मला थोडा धक्का बसला. मला बाद करण्यासाठी नव्हे, तर दुखापतग्रस्त करून मालिकेच्या बाहेर करण्यासाठी जणू तो सातत्याने शरीरावर मारा करत आहे, असेच वाटले. यापूर्वी मी बुमराला अशी गोलंदाजी करताना कधीही पाहिले नव्हते, असे अँडरसन म्हणाला.

वेंगसरकर यांच्याकडून कोहलीचे कौतुक

विराट कोहलीची आक्रमक वृत्ती आणि खेळाविषयीची त्याची आवड व निष्ठेचे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी कौतुक केले आहे. ह्यह्य१६ वर्षांखालील वयोगटाच्या स्पर्धांपासून मी कोहलीला पाहत आहे. त्या वेळी मी ह्यबीसीसीआयह्णच्या गुणवत्ता शोध विकास मोहिमेचा (टीआरडीओ) प्रमुख होतो. त्याला असलेला आक्रमक वृत्तीचा ध्यास आजही कायम आहे. त्यामुळेच तो आंतरराष्ट्रीय स्तरावर इतका यशस्वी आहे, असे वेंगसरकर म्हणाले.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यामुळे सिराज कोणत्या दर्जाचा गोलंदाज आहे, हे दिसून आले. परदेशातील कसोटींमध्ये सलामीवीरांचे योगदान मोलाचे असते. रोहित-राहुल दोघेही सातत्यपूर्ण कामगिरी करत असल्यामुळे मधल्या फळीवरील दडपण कमी झाले आहे. लीड्स येथील कसोटी जिंकून मालिकेत २-० अशी आघाडी घेण्यासाठी आम्ही तयार आहोत, असे कर्णधार म्हणून मी ठामपणे सांगू शकतो. – विराट कोहली, भारताचा कर्णधार

संघाच्या गरजेनुसार सलामीला अथवा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरण्यासाठी मी सज्ज आहे. भारताची वेगवान फळी सध्या विश्वात सर्वोत्तम आहे. त्यामुळे माझे सुरुवातीच्या ३० चेंडूंवर घाई न करण्याचे लक्ष्य असेल. तिसऱ्या कसोटीत भारताला नक्कीच कडवी झुंज देऊ. – डेव्हिड मलान, इंग्लंडचा फलंदाज

संघ

भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, मयांक अगरवाल, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रित बुमरा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, के. एल. राहुल, वृद्धिमान साहा, अभिमन्यू ईश्वरन, पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव.

इंग्लंड : जो रूट (कर्णधार), मोईन अली, जेम्स अँडरसन, जोनाथन बेअरस्टो, रॉली बन्र्स, जोस बटलर (यष्टीरक्षक), सॅम करन, हसीब हमीद, डॅन लॉरेन्स, साकिब मेहमूद, डेव्हिड मलान, क्रेग आव्हर्टन, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन.

वेळ : दुपारी ३.३० वा.

थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स, सोनी टेन ३ (हिंदी)