News Flash

आशिया चषक क्रिकेट स्पर्धा : भारतीय संघाचा आज हाँगकाँगशी सामना

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी दुबळ्या हाँगकाँगला नमवणे भारताला फारसे जड जाणार नाही

| September 18, 2018 03:13 am

हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात धोनी पाचव्य क्रमांकावर फलंदाजील उतरणार आहे, हे रोहित शर्माच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट झाले आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या लढतीची रंगीत तालीम!

दुबई : आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी दुबळ्या हाँगकाँगला नमवणे भारताला फारसे जड जाणार नाही. परंतु परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध बुधवारी होणाऱ्या लढतीच्या दृष्टीने रंगीत तालीम म्हणून भारतीय संघ या लढतीकडे पाहात आहे.

नियमित संघनायक विराट कोहलीच्या अनुस्थितीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ हाँगकाँगलासुद्धा कमी लेखण्याची चूक करणार नाही. दुबईच्या उष्ण वातावरणात तापमान ४३ अंशाइतके आहे. या परिस्थितीत पाकिस्तानशी सामना करण्यापूर्वी योग्य सांघिक समतोल साधण्याचे आव्हान भारतीय संघापुढे असेल. हाँगकाँगने रविवारी आपला पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध गमावला. पाकिस्तानने हाँगकाँगचा डाव ११६ धावांत गुंडाळत आठ विकेट राखून विजय मिळवला.

रोहित, शिखर धवन, लोकेश राहुल, केदार जाधव यांच्यासारखे फलंदाज आणि जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल यांच्यासारखे गोलंदाज संघात असल्यामुळे भारतीय संघ मजबूत आहे. बुमरा-भुवनेश्वर द्वयीचा वेगवान मारा आणि यादव-चहलची फिरकी गेले वर्षभर वर्चस्व गाजवत आहे. त्यामुळे हाँगकाँगला चमत्कारिक कामगिरीच तारू शकते.

मधली फळी सुधारणे हे पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पाश्र्वभूमीवर भारतासाठी महत्त्वाचे ठरेल. लोकेश राहुल तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला उतरण्याची शक्यता आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आगामी पाकिस्तानविरुद्धच्या लढतीच्या दृष्टिकोनातून श्रीलंकेहून एक गोलंदाजीचा विशेषज्ञ आमंत्रित केला आहे. पाकिस्तानच्या डावखुऱ्या वेगवान माऱ्याला सामना करण्यासाठी त्याचे मार्गदर्शन भारताला मोलाचे ठरेल.

धोनी रडारवर

गेली काही वर्षे महेंद्रसिंग धोनीच्या फलंदाजीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यामुळे या स्पर्धेतील धोनीच्या कामगिरीकडे निवड समितीचे बारकाईने लक्ष असेल. हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात धोनी पाचव्य क्रमांकावर फलंदाजील उतरणार आहे, हे रोहित शर्माच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मनीष पांडे, केदार जाधव, अंबाती रायुडू हे खेळाडू मधल्या फळीतील अन्य स्थानांसाठी दावेदार असतील. मोठे फटके खेळण्यात पटाईत असलेला हार्दिक पंडय़ासुद्धा सातव्या स्थानावर खेळू शकेल.

भारतीय संघाला मधल्या फळीची समस्या प्रामुख्याने भेडसावत आहे. या फळीतील चौथ्या आणि सहाव्या क्रमांकाला स्थर्य देऊ शकणाऱ्या फलंदाजाचा शोध या स्पर्धेत घेतला जाणार आहे. मनीष पांडे, केदार जाधव, अंबाती रायुडू हे खेळाडू या स्थानांसाठी प्रमुख दावेदार असतील.

 रोहित शर्मा, भारताचा कर्णधार

संघ

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, अंबाती रायुडू, मनीष पांडे, केदाज जाधव, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), हार्दिक पंडय़ा, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमरा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, शार्दुल ठाकूर, दिनेश कार्तिक, खलील अहमद.

हाँगकाँग : अंशुमन राठ (कर्णधार), ऐझाझ खान, बाबर हयात, कॅमेरून मॅक्युल्सन, ख्रिस्तोफर कार्टर, एहसान खान, एहसान नवाझ, अर्शद मोहम्मद, किनचिट शाह, नदीम अहमद, राग कपूर, स्कॉट मॅककेहनी, तन्वीर अहमद, तन्वीर अफझल, वाकस खान, अफताब हुसैन.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2018 3:13 am

Web Title: india face hong kong before pakistan clash in asia cup 2018
Next Stories
1 चीन खुली  बॅडमिंटन स्पर्धा : सिंधू-श्रीकांत यांच्या मार्गात तंदुरुस्तीचाच अडथळा
2 जागतिक  कुस्ती स्पर्धा : भारतीय संघात साक्षी मलिकला स्थान
3 रोनाल्डोचा गोलदुष्काळ संपुष्टात ; दोन गोलच्या बळावर युव्हेंट्सचा विजय
Just Now!
X