News Flash

षटकांची गती कायम न राखल्यामुळे भारतीय खेळाडूंवर ICC ची कारवाई

पहिल्या सामन्यात भारताच्या पदरी पराभव

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वन-डे सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. ६६ धावांनी ऑस्ट्रेलियाने भारतावर मात केली. या पराभवानंतर षटकांची गती कायम न राखल्याप्रकरणी आयसीसीने भारतीय खेळाडूंवर कारवाई केली आहे. भारतीय खेळाडूंच्या मानधनातली २० टक्के रक्कम कापून घेतली जाणार आहे. सामनाधिकारी डेव्हिड बून यांनी हा निर्णय सूनावला.

अवश्य वाचा –  ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाचा सर्व मालिकांमध्ये पराभव होईल !

पहिला वन-डे सामना संपण्यासाठी भारतीय वेळेनुसार जवळपास ६ वाजले होते. काही ऑस्ट्रेलियन खेळाडूंनीही सामना लांबल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. सामन्यातील पंच रॉड टकर, सॅम नोगाजस्की आणि तिसरे पंच पॉल रेफेल यांनी दिलेल्या तक्रारीवरुन भारतीय संघावर ही कारवाई करण्यात आली. रविवारी दोन्ही संघात दुसरा वन-डे सामना खेळवला जाणार आहे.

अवश्य वाचा – Ind vs Aus : याचं आधारकार्ड बनवा…स्टिव्ह स्मिथला भारतीय नागरिकत्व देण्याची आकाश चोप्राची मागणी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2020 2:34 pm

Web Title: india fined for slow over rate in the first odi against australia psd 91
Next Stories
1 भारतीय संघाला अजुनही धोनीची उणीव भासते आहे – मायकल होल्डिंग
2 अन् मॅक्सवेलनं राहुलची मागितली माफी
3 चुकीची संघ निवड भारतीय संघाला भोवली का?
Just Now!
X