News Flash

नेशन्स चषक बुद्धिबळ स्पर्धा : आनंदच्या विजयामुळे भारत पाचव्या स्थानी

सहाव्या फेरीत अमेरिकेने भारताला २.५-१.५ अशा फरकाने नामोहरम केले असले तरी भारताला पाचवे स्थान गाठता आले आहे.

संग्रहित छायाचित्र

 

माजी विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदने नेशन्स चषक सांघिक ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेत गुरुवारी पहिल्या विजयाची नोंद केली. परंतु तिसऱ्या दिवसाच्या पाचव्या फेरीत रशियाने बरोबरीत रोखले. मग सहाव्या फेरीत अमेरिकेने भारताला २.५-१.५ अशा फरकाने नामोहरम केले असले तरी भारताला पाचवे स्थान गाठता आले आहे.

पाचव्या फेरीत ५० वर्षीय आनंदने रशियाचा ग्रँडमास्टर इयान नेपोमनियाचशीला फक्त १७ चालींत पराभूत केले. मग बी. अधिबान आणि द्रोणावल्ली हरिका यांनी अनुक्रमे सर्जी कर्जकिन आणि ओल्गा गिर्या यांना बरोबरीत रोखले. परंतु व्लादिस्लाव्ह आर्टेमीव्हने पी. हरिकृष्णाला पराभूत केल्यामुळे रशियाला सामन्यात २-२ अशी बरोबरी साधता आली.

अमेरिकेविरुद्धच्या सहाव्या फेरीत आनंद, विदीत गुजराती आणि कोनेरू हम्पी यांनी अनुक्रमे हिकारू नाकामुरा, फॅबिओ कारूआना आणि इरिना कृश यांच्याशी बरोबरी साधली, मात्र वेस्ली सो याच्याकडून अधिबानला दारुण पराभव पत्करावा लागल्याने भारताचा पराभव झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2020 3:00 am

Web Title: india finished fifth due to anands victory abn 97
Next Stories
1 कुलदीप यादव म्हणतो, धोनीने टी-२० विश्वचषकात खेळायलाच हवं !
2 ‘लॉकडाउन’मध्ये समायराला मिळाले नवे मित्र; रोहितने शेअर केला फोटो
3 वन-डे क्रिकेटमध्ये रोहित सचिनपेक्षा सर्वोत्तम सलामीवीर, न्यूझीलंडच्या माजी खेळाडूचं मत
Just Now!
X