आशियाई फुटबॉल चषक स्पर्धेत ताजिकिस्तानविरुद्ध आज होणाऱ्या २३ वर्षांखालील गटातील फुटबॉल सामन्यात भारताला विजय मिळवणे अनिवार्य आहे. गतविजेत्या उझबेकिस्तानशी पहिल्याच सामन्यात भारताला मोठा पराभव पत्करावा लागल्याने भारतीय युवांसाठी आजचा सामना म्हणजे ‘करो या मरो’ परिस्थितीतील आहे.

या सामन्यात भारतीय संघ आपला सर्वोत्तम खेळ करून घवघवीत यश मिळवेल, असा विश्वास भारताचे प्रशिक्षक डेरिक परेरा यांनी व्यक्त केला आहे. मागील सामन्याच्या पूर्वार्धात भारताने उझबेकिस्तानला तुल्यबळ लढत दिली होती. मात्र उत्तरार्धात दर्जा घसरल्यानेच पराभव सहन करावा लागला होता.

आंतरराष्ट्रीय सामन्यात फारसा अनुभव गाठीशी नसल्याचा फटका भारताला बसला होता.  मात्र ताजिकिस्तानविरुद्ध भारत दमदार खेळ करेल. ताजिकिस्तानला आम्ही कडवी लढत देऊ, असा विश्वास संघाचा कर्णधार विनित राय याने व्यक्त केला आहे.