News Flash

भारत-जर्मनी हॉकी मालिका : जर्मनीकडून भारतीय महिला संघाचा धुव्वा

पियाने नोंदवलेल्या दोन गोलमुळे जर्मनीने पहिल्या सत्रात २-० अशी आघाडी मिळवली.

(संग्रहित छायाचित्र)

ड्युसेलडर्फ : जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या जर्मनीने चार सामन्यांच्या हॉकी मालिकेतील शनिवारी झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघाचा ५-० असा धुव्वा उडवला.

जर्मनीकडून पिया मार्टेन्स (१०व्या, १४व्या मिनिटाला), लीना मिखिल (२०व्या मि.), पॉलिन हेन्झ (२८व्या मि.) व लिसा अल्टेन बर्ग (४१व्या मि.) यांनी गोल साकारले.

पियाने नोंदवलेल्या दोन गोलमुळे जर्मनीने पहिल्या सत्रात २-० अशी आघाडी मिळवली. दुसऱ्या सत्रात भारताने त्वरित प्रतिहल्ला करीत पेनल्टी कॉर्नर मिळवला, परंतु जर्मनीच्या बचावपटूंनी हा प्रयत्न हाणून पाडला. २०व्या मिनिटाला लीनाने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतरण केले. आठ मिनिटांनंतर मध्यरक्षक पॉलिनने केलेल्या गोलमुळे मध्यांतराला जर्मनीकडे ४-० अशी आघाडी होती. तिसऱ्या सत्रात ४१व्या मिनिटाला यजमानांसाठी लिसाने पाचवा गोल केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2021 2:41 am

Web Title: india germany hockey series akp 94
Next Stories
1 शिखा, वेदा यांना वगळले
2 इंग्लंडचा भारत दौरा : चौथ्या कसोटीत फलंदाजांसाठी नंदनवन?
3 पुण्यातील भारत-इंग्लंड मालिकेला शासनाची परवानगी
Just Now!
X