News Flash

ICC मध्ये भारताची नारी शक्ती! जी. एस. लक्ष्मी यांना मिळाला ‘हा’ बहुमान

जी. एस. लक्ष्मी ICC पॅनेलवरील पहिल्यावहिल्या महिला सामनाधिकारी

ICC मध्ये भारताची नारी शक्ती! जी. एस. लक्ष्मी यांना मिळाला ‘हा’ बहुमान
जी. एस. लक्ष्मी

एखाद्या क्रिकेट सामन्यामध्ये खेळाडूंइतकीच पंच आणि सामनाधिकारी यांची भूमिका महत्वाची असते. नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या क्लेरी पोलोसाक यांनी नामिबिया विरुद्ध ओमान यांच्यातील सामन्यात पंचांची भूमिका पार पाडली. ICC ची मान्यता असलेल्या पुरुषांच्या सामन्यात पंच म्हणून काम पाहणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या. त्यानंतर आता भारताच्या नारी शक्तीचा डंका ICC मध्ये वाजला आहे. ICC ने भारताच्या जी. एस. लक्ष्मी यांना पहिल्यावहिल्या महिला सामनाधिकारी होण्याचा बहुमान प्रदान केला आहे.

भारताच्या जी. एस. लक्ष्मी यांची ICC च्या आंतरराष्ट्रीय सामनाधिकारी पॅनेलवर नियुक्ती करण्यात आली आहे. हा बहुमान मिळालेल्या त्या पहिल्यावहिल्या महिला ठरल्या आहेत, असे ICC ने प्रसिद्धी पत्रकात लिहिले आहे. १४ मे रोजी हे प्रसिद्धी पत्रक काढण्यात आले. ५१ वर्षीय लक्ष्मी यांनी २००८ – ०९ मध्ये पहिल्यांदा देशांतर्गत सामन्यात सामानाधिकारी म्हणून काम पाहिले. त्यानंतर लक्ष्मी यांनी ३ महिला आंतरराष्ट्रीय सामन्यात सामनाधिकारी म्हणून पद भूषवले. तसेच ३ टी २० सामन्यातही सामानाधिकारी म्हणून काम पाहिले. आता त्यांना तत्काळ प्रभावाने ICC च्या सामन्यात सामनाधिकारी म्हणून कार्यरत होण्याची संधी मिळणार आहे.

ICC च्या आंतरराष्ट्रीय सामनाधिकारी पॅनेलवर नियुक्ती होणे हा माझा सन्मान आहे. या मुळे आता मला अनेक ठिकाणी जात येईल आणि समानाधिकारी म्हणून भूमिका पार पाडता येईल. महिला कसोटीपटू म्हणून माझी कारकीर्द खूप दीर्घ होती. आता सामानाधिकारी म्हणूनदेखील माझी कामगिरी चांगली असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच ICC चे देखील त्यांनी आभार मानले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2019 6:33 pm

Web Title: india gs lakshmi got appointed as first ever female match referee by icc
Next Stories
1 IPL 2019 Final : CSK चा संघ म्हणतो ‘हाच’ आमचा विजेतेपदाचा कप..
2 World Cup 2019 : ”चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी ‘टीम इंडिया’कडे हवे तेवढे पर्याय”
3 Cricket Awards : विराट, रोहित सर्वोत्तम; मराठमोळ्या स्मृती मंधानालाही पुरस्कार