IAAF Under-20 चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये सुवर्णपदकावर नाव कोरणाऱ्या हिमा दासची अती घाई भारतला नडली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील अॅथलेटिक्समध्ये २०० मी शर्यतीतून बाहेर पडली आहे. अतिघाईमुळे हिमा दासची सुरुवात चुकली आणि पंचानी तिला बाहेरचा रस्ता दाखवला.  २०० मी शर्यत सुरू करण्यासाठी जो स्टार्ट करण्यासाटी सिग्नल दिला जातो. पण पंचांनी सिग्नल देण्यापूर्वीच हिमा दासने आपली जागा सोडली. त्यामुले तिला स्पर्धेतून बाद केले आहे. हिमा दासच्या या कामगिरीमुळे भारताचे एक पद गमावले आहे.

भारताच्या दुती चंदने २३.०० सेंकदामध्ये २०० मी स्पर्धेत भारताचे आव्हान कायम ठेवले आहे. २०० मी शर्यतीत द्युती चंदने अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले आहे. द्युती चंदने .०१ सेकंदाच्या अंतराने अडीडीओंग ओडीओंगीचा पराभव केला.

आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सध्या भारतीय पथकातील खेळाडू समाधानकारक कामगिरी करत आहेत.  ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताच्या हिमा दासने रौप्यपदकाची कमाई केली आहे. पण आती घाईमुळे हिमा दासला २०० मीटरमध्ये सुवर्णपदकाने हुलकवणी दिली आहे.