News Flash

माजी ऑस्ट्रेलियन खेळाडूने सांगितलं टीम इंडियाच्या पराभवाचं कारण, बघा तुम्हाला पटतंय का??

७ गडी राखत न्यूझीलंडची दुसऱ्या कसोटीत बाजी

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला न्यूझीलंड दौऱ्यात दुसऱ्या व्हाईटवॉशला सामोरं जावं लागलं आहे. ख्राईस्टचर्च कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी यजमान न्यूझीलंडने विजयासाठी दिलेलं १३२ धावांचं आव्हान ७ गडी राखत पूर्ण केलं. यामुळे वन-डे मालिकेपाठोपाठ कसोटी मालिकेतही भारतीय संघाला पराभवाचं तोंड पहावं लागलं आहे. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतला भारतीय संघाचा हा पहिला मालिका पराभव ठरला आहे.

अवश्य वाचा – Ind vs NZ : कसोटी कारकिर्दीत मयांक अग्रवालवर पहिल्यांदाच ओढवली नामुष्की

ऑस्ट्रेलियन संघाचे माजी खेळाडू इयन चॅपल यांनी भारतीय संघाच्या खराब कामगिरीचं विश्लेषण केलं आहे. टी-२० मालिकेत रोहित शर्माच्या दुखापतीनंतर भारतीय संघाला योग्य अशी सुरुवात न मिळाल्यामुळे पराभवाचा सामना करावा लागल्याचं मत चॅपल यांनी व्यक्त केलं.

“वन-डे मालिकेपासून सुरु झालेला संघ निवडीचा मुद्दा कसोटी मालिकेतही कायम राहिला. वरकरणी हा एक योगायोग वाटत असला तरीही आपण पाहिलं तर रोहित शर्मा दुखापतीमुळे संघाबाहेर गेल्यानंतर टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यात जिंकू शकलेली नाहीये.” Espncricinfo संकेतस्थळावर लिहीलेल्या लेखात चॅपल यांनी आपलं मत मांडलं.

अवश्य वाचा – विराट दडपणाखाली चुका करतो, न्यूझीलंडच्या गोलंदाजांने सांगितला मास्टरप्लॅन

न्यूझीलंड दौऱ्यानंतर टीम इंडिया घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ वन-डे सामन्यांची मालिका खेळणार आहे.

अवश्य वाचा – Ind vs NZ : परदेशात चालत नाही विराट कोहलीची जादू, आकडेवारीच देतेय साक्ष

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2020 10:15 am

Web Title: india have not won since rohit sharma injury ian chappell decodes team india downfall in nz psd 91
टॅग : Ind Vs Nz
Next Stories
1 विराटने सांगितलं पराभवामागचं खरं कारण, म्हणाला…
2 विराट दडपणाखाली चुका करतो, न्यूझीलंडच्या गोलंदाजाने सांगितला मास्टरप्लॅन
3 Ind vs NZ : परदेशात चालत नाही विराट कोहलीची जादू, आकडेवारीच देतेय साक्ष
Just Now!
X