News Flash

भारताची अर्जेंटिनावर सरशी

भारतीय पुरुष हॉकी संघाने विद्यमान ऑलिम्पिक विजेत्या अर्जेंटिनाचा ४-३ असा पराभव

(संग्रहित छायाचित्र)

भारताचा अर्जेंटिना हॉकी दौरा

भारतीय पुरुष हॉकी संघाने विद्यमान ऑलिम्पिक विजेत्या अर्जेंटिनाचा ४-३ असा पराभव करत अर्जेंटिना हॉकी दौऱ्यातील पहिल्या सराव सामन्यात आश्वासक सुरुवात केली.

मंगळवारी मध्यरात्री झालेल्या या सामन्यात भारताकडून निळकंठ शर्मा (१६व्या मिनिटाला), हरमनप्रीत सिंग (२८व्या मिनिटाला), रुपिंदरपाल सिंग (३३व्या मिनिटाला) आणि वरुण कुमार (४७व्या मिनिटाला) यांनी गोल करत विजयात योगदान दिले. लिआंड्रो टोलिनी (३५व्या आणि ५३व्या मिनिटाला) आणि मायको कॅसेला (४१व्या मिनिटाला) यांनी यजमानांसाठी गोल केले.

‘‘उत्कंठावर्धक रंगलेला हा उत्तम सराव सामना होता. दोन्ही संघांनी तोडीस तोड खेळ केला. ऑलिम्पिक विजेत्या अर्जेंटिनासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध विजय मिळवणे ही खूपच चांगली बाब म्हणावी लागेल. या विजयामुळे आमचा आत्मविश्वास उंचावला आहे,’’ असे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2021 12:12 am

Web Title: india hockey tour to argentina india win over argentina abn 97
Next Stories
1 भारताच्या ज्युदो संघाची ऑलिम्पिक पात्रता फेरीतून माघार
2 नेत्रा कुमानन ऑलिम्पिकसाठी पात्र
3 पाकिस्तान फुटबॉल फेडरेशनला फिफाचा दणका
Just Now!
X