02 March 2021

News Flash

भारताच्या कनिष्ठ महिला संघाची चिलीशी बरोबरी

भारताच्या महिला कनिष्ठ हॉकी संघाने दोन पिछाडी भरून काढताना चिलीविरुद्धच्या चौथ्या सामन्यात २-२ अशी बरोबरी साधली.

गगनदीप कौर

चिलीविरुद्धचा हॉकी दौरा

भारताच्या महिला कनिष्ठ हॉकी संघाने दोन पिछाडी भरून काढताना चिलीविरुद्धच्या चौथ्या सामन्यात २-२ अशी बरोबरी साधली.

प्रिन्स ऑफ वेल्स कंट्री क्लबवर झालेल्या या सामन्यात भारताकडून दीपिका (४०व्या मि.) आणि गगनदीप कौर (५५व्या मि.) यांनी गोल नोंदवले, तर  चिलीकडून मरिआना डेल जीसस लॅगोस (२१व्या मिनिटाला) आणि फर्नाडा व्हिलाग्रान (५१व्या मि.) यांनी गोल झळकावले.

दौऱ्यावरील पहिल्या तिन्ही सामन्यांत विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाने या सामन्यालाही उत्तम सुरुवात केली. चिलीचा बचाव भेदण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न पहिल्या सत्रात अयशस्वी ठरले. दुसऱ्या सत्रात चिलीच्या प्रत्युत्तराला यश मिळाले. मरिआनाने चिलीचे खाते उघडले. मग तिसऱ्या सत्रात भारताला दीपिकाने बरोबरी साधून दिली. अखेरचे सत्र रंगतदार ठरले. ५१व्या मिनिटाला फर्नाडाने पेनल्टी कॉर्नरद्वारे पुन्हा चिलीला आघाडी मिळवून दिली. पण चारच मिनिटांत गगनदीपने बरोबरी साधून दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2021 12:24 am

Web Title: india junior women team draws with chile abn 97
Next Stories
1 मरेची ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेतून माघार
2 तब्बल ६८ सामन्यांनंतर लिव्हरपूलचा पराभव
3 भारताला नमवणे अ‍ॅशेसपेक्षा महत्त्वाचे!
Just Now!
X