News Flash

जागतिक रस्ते सुरक्षा क्रिकेट मालिका : भारत लिजंड्सला जेतेपद

इरफान-युसूफ या पठाण बंधूंनी श्रीलंकेच्या चार फलंदाजांना माघारीचा रस्ता दाखवला.

रायपूर : युसूफ पठाण आणि युवराज सिंगची तडाखेबंद अर्धशतकी खेळी तसेच पठाण बंधूंनी गोलंदाजीत दिलेल्या योगदानामुळे भारत लिजंड्स संघाने श्रीलंका लिजंड्सचा १४ धावांनी पराभव करून जागतिक रस्ते सुरक्षा क्रिकेट मालिकेचे जेतेपद संपादन केले.

युसूफच्या नाबाद ६२ धावा तसेच युवराजच्या ६० धावांच्या खेळीमुळे भारताने २० षटकांत ४ बाद १८१ धावा उभारल्या. मग इरफान-युसूफ या पठाण बंधूंनी श्रीलंकेच्या चार फलंदाजांना माघारीचा रस्ता दाखवला. सनथ जयसूर्याने ४३ धावा केल्या. कौशल्य वीररत्ने (३८) व चिंतका जयसिंघे (४०) यांनी अखेरच्या क्षणी प्रतिकार केला तरी श्रीलंकेला ७ बाद १६७ धावा  करता आल्या.

संक्षिप्त धावफलक

भारत लिजंड्स : २० षटकांत ४ बाद १८१ (युसूफ पठाण नाबाद ६२, युवराज सिंग ६०; रंगना हेराथ १/११) विजयी वि. श्रीलंका लिजंड्स : २० षटकांत ७ बाद १६७ (सनथ जयसूर्या ४३, चिंतका जयसिंघे ४०; युसूफ पठाण २/२६, इरफान पठाण २/२९).

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2021 12:53 am

Web Title: india legends beat sri lanka legends in the final of road safety world series zws 70
Next Stories
1 भारत-आफ्रिका क्रिकेट मालिका : भारताचा सलग दुसरा पराभव
2 ट्वेन्टी-२० विश्वचषकात रोहित-विराट सलामीला!
3 विश्वचषक नेमबाजी स्पर्धा : भारतीय नेमबाजांचे वर्चस्व!
Just Now!
X