सिडनी येथे होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी भारताने आपल्या संघाची घोषणा केली आहे. भारताने संघात तीन बदल केले आहेत. इशात शर्माला आराम देण्यात आला आहे. तर रोहित शर्माने चौथ्या कसोटीतून माघार घेतली आहे. भारताने जाहिर केलेल्या १३ जणांच्या संघामध्ये उमेश यादव, अश्विन, कुलदीप यादव आणि केएल राहुलला स्थान देण्यात आले आहे. सिडनीची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना साजेशी असल्यामुळे भारत दोन फिरकी गोलंदाजासह मैदानात उतरण्याची शक्यता आहे. अश्निनची निवडही फिटनेस चाचणीनंतर केली जाईल असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. केएल राहुलला संधी दिल्यामुळे विहारी सहाव्या स्थानवर फलंदाजी करू शकतो. मयंक अग्रवाल आणि केएल राहुल यांच्यावर सलामीची जबाबदारी असणार आहे.

असा आहे संघ – विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ंपंत, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, आर. अश्निन, शामी, बुमराह आणि उमेश यादव</p>

India name 13-man squad for SCG Test: Virat Kohli (C), A Rahane (VC), KL Rahul, Mayank Agarwal, C Pujara, H Vihari, R Pant, R Jadeja, K Yadav, R Ashwin, M Shami, Jasprit Bumrah, Umesh Yadav

A decision on R Ashwin’s availability will be taken on the morning of the Test #AUSvIND pic.twitter.com/4Lji2FExU8

— BCCI (@BCCI) January 2, 2019

 भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये चौथा कसोटी सामना उद्यापासून सिडनी इथं होणार आहे. भारतानं या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. अखेरचा सामना जिंकून ३-१ मालिका खिशात घालण्याचा भारताचा प्रयत्न राहणार आहे.