News Flash

‘सुंदर’ सरप्राइज… गुगलवर Indian Cricket Team असं टाइप तर करुन बघा

अनेक क्रीडा प्रेमींनी यामुळे गुगलाचं आभारही मानले आहेत.

ब्रिस्बेनमधील गाबा मैदानवर भारतीय क्रिकेट संघानं ऑस्ट्रेलियाचा पराभव करत ऐतिहासिकविजय मिळवला. या विजयाचा जल्लोष गुगलही करत आहे. गुगलवर तुम्ही Indian Cricket Team किवां India national cricket team असं टाइप करुन सर्च करा. तुम्हाला व्हर्चुअल आतिशबाजी दिसेल.

बॉर्डर-गावसकर मालिका भारतानं जिंकल्यानंतर गुगुलनं क्रीडा चाहत्यांना हे खास सरप्राइज दिलं आहे. ब्रिस्बेन येथील कसोटी सामना जिंकून भारतीय संघानं लागोपाठ तिसऱ्यांदा बॉर्डर-गावसकर मालिकेवर वर्चस्व मिळवलं आहे. ऑस्ट्रेलियाचा अभेद्य किल्ला असलेल्या गाबावर भारतीय संघानं तीन विकेटनं विजय मिळवला.

नटराजनच्या स्वागताला बग्गी; सेहवागने शेअर केलेला Video बघाच

ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजाय प्रत्येक भारतीयानं साजरा केला. कोणी सोशल मीडियावर तर कोणी फटाके वाजवून. अनेकांनी फेसबुक आणि ट्विटवर आपल्या भावानांना वाट मोकळी करुन दिली. बुधवारी गुगलनेही ट्विट करुन ‘India national cricket team’ सर्च करण्यास सांगून व्हर्चुअल आतिषबाजीची माहिती दिली.

आणखी वाचा- IND vs AUS: ‘जेवढं यश भारतीय संघाचं तितकचं’…इंझमाम उल हक म्हणाला…

गुगलवर तुम्ही ‘India national cricket team’ सर्च केल्यास तुम्हालाही या आतिषबाजीचा आनंद घेता येईल. मोबाईल किंवा डेस्कटॉपवर सर्च करुन पाहू शकता. अनेक क्रीडा प्रेमींनी यामुळे गुगलाचं आभारही मानले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2021 8:51 am

Web Title: india national cricket team test series victory against australia celebrated by google with virtual fireworks nck 90
Next Stories
1 IPL 2021 : राजस्थानचा ‘हा’ धडाकेबाज फलंदाज आता चेन्नईच्या संघात
2 IND vs ENG : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर
3 “अम्पायर्सनी आम्हाला सामना सोडण्याचा पर्याय दिला होता,” मोहम्मद सिराजचा मोठा खुलासा
Just Now!
X