आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या(आयसीसी) एकदिवसीय संघांच्या क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या भारतीय संघाला आपल्या स्थानात सुधारणा करण्यासाठी न्यूझीलंडविरुद्धची मालिका ४-१ अशा फरकाने जिंकावी लागणार आहे. भारतीय संघ एकदिवसीय क्रमवारीत सध्या ११० गुणांसह चौथ्या तर न्यूझीलंडचा संघ ११३ गुणांसह तिसऱया स्थानावर आहे. त्यामुळे न्यूझीलंडला मागे टाकून आपल्या क्रमवारीत सुधारणा करण्यासाठी भारतीय संघाला पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका कमीत कमी ४-१ अशा फरकाने जिंकावी लागणार आहे. येत्या १६ ऑक्टोबरपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात एकदिवसीय मालिकेची सुरूवात होणार आहे.
दुसरीकडे न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट गोलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. त्याचा न्यूझीलंडच्या संघात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे बोल्टचे स्थान अबाधित राहिल असा अंदाज आहे. कारण भारतीय संघाचा सध्याचा सर्वाधिक गुणांचा गोलंदाज आर.अश्विनला या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. फलंदाजांमध्ये विराट कोहली दुसऱया स्थानावर कायम आहे, तर पहिले स्थान द.आफ्रिकेच्या ए.बी.डीव्हिलियर्सकडे आहे..