08 March 2021

News Flash

India Open : बॅडमिंटनपटू श्रीकांतची अंतिम फेरीत धडक

चीनच्या प्रतिस्पर्ध्याला १६-२१, २१-१४, २१-१९ अशी चारली धूळ

India Open : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांत याने इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत धमाकेदार पुनरागमन करत विजय मिळवला. स्पर्धेच्या उपांत्य फेरीत चीनचा बॅडमिंटनपटू हुआंग युषीआंग याला श्रीकांतने १६-२१, २१-१४, २१-१९ अशी धूळ चारली. सामन्याच्या सुरुवातीला श्रीकांतला पहिला गेम गमवावा लागला. १६-२१ असा ५ गुणांच्या फरकाने तो पहिला गेम पराभूत झाला. पण दुसऱ्या गेममध्ये त्याने दमदार पुनरागमन केले. त्याने दुसरा गेम २१-१४ असा खिशात घातला. त्यामुळे सामन्यात रंगत वाढली आणि तिसरा गेम निर्णायक ठरला. या गेम अटीतटीचा झाला. मात्र श्रीकांतने आपला अनुभव पणाला लावत तिसरा गेम केवळ २ गुणांच्या फरकाने जिंकला. या विजयासह त्याने दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत त्याचा सामना सहकारी परुपल्ली कश्यप आणि डेन्मार्कचा व्हिक्टर एक्सलसन यांच्यातील विजेत्यांशी होईल.

या स्पर्धेत भारताच्या किदम्बी श्रीकांत, परुपल्ली कश्यप आणि पी. व्ही. सिंधू यांनी शुक्रवारी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती, तर महिलांच्या दुहेरीत भारताच्या अश्विनी पोनप्पा आणि एन. सिक्की रेड्डी या जोडीचे आव्हान संपुष्टात आले होते. पुरुष एकेरीत श्रीकांतने उपांत्यपूर्व फेरीत भारताच्याच बी. साईप्रणीतला नमवले. या सामन्यात साईप्रणीतने अटीतटीच्या झुंजीत पहिला गेम २३-२१ असा जिंकत श्रीकांतला आव्हान दिले होते. दुसऱ्या गेममध्ये श्रीकांतने २१-११ असे दमदार पुनरागमन करीत सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. तिसरा गेम पुन्हा अत्यंत चुरशीचा झाला. त्यात श्रीकांतने २१-१९ अशी बाजी मारली. कश्यपने तैपेईच्या वॅँग झु वेईवर सलग दोन गेममध्ये २१-१६, २१-११ अशी मात केली.

महिला एकेरीत सिंधूने उपांत्यपूर्व फेरीत डेन्मार्कच्या मिआ ब्लिचफेल्टला २१-९, २२-२० असे पराभूत केले. त्यामुळे सिंधूला आता उपांत्य फेरीत चीनच्या हे बिंगजिओ हिच्याशी झुंजावे लागणार आहे. महिला दुहेरीत इंडोनेशियाच्या अप्रियानी रहायू आणि ग्रेसिया पोल्ली जोडीने अश्विनी आणि सिक्की जोडीला २१-१०, २१-१८ असे पराभूत केले. याचप्रमाणे द्वितीय मानांकित जाँगकॉलफान किटिथाराकुल आणि रविंदा प्राजोंगजल जोडीने अपर्णा बालन आणि श्रुती केपी जोडीचा २१-८, २१-११ असा पराभव केला. पुरुष दुहेरीत भारताच्या मनू अत्री आणि सुमीत रेड्डी या जोडीने भारताच्याच प्रणव जेरी चोप्रा आणि शिवम शर्मा या जोडीला २१-१०, २१-१२ असे नमवले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 30, 2019 6:58 pm

Web Title: india open badminton indian shuttler k srikanth enters final beating china huang yuxiang
टॅग : Badminton
Next Stories
1 IPL 2019 : ‘Universal Boss’ गेल समोर सगळे फेल, केली अनोख्या विक्रमाची नोंद
2 IPL 2019 : युवीची षटकारांची हॅटट्रिक; ब्रॉडचा चहलला खोचक टोमणा
3 IPL 2019 : DRS घ्यावा की नाही? गोंधळामुळे मुंबईने गमावली रोहितची विकेट
Just Now!
X