News Flash

जपानच्या टॅगोला नमवून सौरभ मुख्य फेरीत

दुखापतीतून सावरत भारताच्या सौरभ वर्माने आंतरराष्ट्रीय स्पध्रेत दमदार पुनरागमन केले.

दुखापतीतून सावरत भारताच्या सौरभ वर्माने आंतरराष्ट्रीय स्पध्रेत दमदार पुनरागमन केले. इंडिया ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पध्रेच्या पात्रता फेरीत सौरभने जपानच्या केनिची टॅगोवर २१-१८, २१-१२ असा विजय मिळवत मुख्य फेरीत प्रवेश केला. तत्पूर्वी, सौरभने भारताच्याच आर.एम.व्ही. गुरुसाईदत्तचा २१-१८, २१-१० असा पराभव केला.
मिश्र दुहेरीत भारताच्या मनू अत्री आणि अश्विनी पोनप्पा यांनी पहिल्या फेरीत सौरव अग्रवाल आणि श्रद्धा तिवारीचा २१-४, २१-८ असा पराभव केला़, तर दुसऱ्या फेरीत पुढे चाल मिळाल्याने त्यांचा मुख्य फेरीतील प्रवेश निश्चित झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 30, 2016 6:34 am

Web Title: india open badminton saurabh varma stuns kenichi tago to reach main draw
Next Stories
1 कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : विश्वविजेतेपदाच्या शर्यतीतून विश्वनाथन आनंद बाद
2 हॉक बे चषक हॉकी स्पर्धा : ऑलिम्पिकच्या सरावासाठी भारतीय महिला हॉकी संघ न्यूझीलंडला रवाना
3 इंडियन ओपन बॅडमिंटन : विजेतेपद राखण्यासाठी सायना, श्रीकांत उत्सुक
Just Now!
X