24 November 2020

News Flash

इंडिया खुली बॉक्सिंग स्पर्धा : मेरी कोम, सरिताला सुवर्ण

एल. सरिता देवी यांनी इंडिया खुल्या बॉक्सिंग स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी सुवर्णपदकावर नाव कोरले.

| May 25, 2019 02:41 am

गुवाहाटी : सहा वेळा विश्वविजेती एम. सी. मेरी कोम आणि एल. सरिता देवी यांनी इंडिया खुल्या बॉक्सिंग स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी सुवर्णपदकावर नाव कोरले.

आशियाई सुवर्णपदक विजेत्या अमित पांघलने आत्मविश्वासाने आगेकूच करणाऱ्या सचिन सिवाचचा ४-१ असा पराभव करून पुरुषांच्या ५२ किलो गटाचे सुवर्णपदक पटकावले. पुरुषांच्या ५२ किलो, ८१ किलो, ९१ किलो आणि +९१ किलो या चार गटांमध्ये आणि महिलांच्या ५१ किलो, ५७ किलो आणि ७५ किलो या तीन गटांमध्ये सर्वच पदकांवर भारतीय खेळाडूंनी वर्चस्व मिळवले.

या स्पर्धेतील १८ पैकी १२ सुवर्णपदकांवर भारताने नियंत्रण मिळवले. नवी दिल्ली येथे गेल्या वर्षी झालेल्या पहिल्या इंडिया खुल्या बॉक्सिंग स्पर्धेत भारताने सहा सुवर्णपदकांची कमाई केली होती. उझबेकिस्तानच्या खेळाडूंचा अभाव असलेल्या या स्पर्धेत भारताने पदकांची संख्या दुप्पट केली आहे.

जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील पदक विजेत्या सरिताने सिम्रनजीत कौरचा ३-२ असा पराभव करून तीन वर्षांनी प्रथमच सुवर्णपदक प्राप्त केले. ६० किलो वजनी गटात पदार्पण करणाऱ्या सिम्रनने पहिल्या फेरीत छाप पाडली. परंतु सरिताने उत्तम प्रतिकार करीत पुनरागमन केले आणि पदकावर नोव कोरले. वर्षांच्या पूर्वार्धात झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सरिताने कांस्यपदक पटकावले होते.

ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या मेरी कोमने मिझोरामच्या माजी राष्ट्रीय विजेत्या वनलाल डुआटीविरुद्धच्या अंतिम लढतीत ५-० असे निर्विवाद वर्चस्व गाजवले. निखात झरीन आणि ज्योतीला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या शिवा थापाने गतविजेत्या मनीष कौशिकला ५-० असे नमवून ६० किलो गटाचे सुवर्णपदक जिंकले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2019 2:41 am

Web Title: india open boxing competition mary kom sarita to get gold
Next Stories
1 हरमनप्रीतची ‘बीसीसीआय’कडे क्रिकेटमधून विश्रांतीची विनंती
2 अखेरच्या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाचा पराभव
3 World Cup Flashback : संघ हरले पण खेळाडू जिंकले!
Just Now!
X