20 November 2019

News Flash

अमित, शिवा, मेरी अंतिम फेरीत

शिवा थापाने (६० किलो) अंतिम फेरी गाठून सुवर्णपदकाच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.

माजी युवा विश्वविजेत्या सचिन सिवाचने (५२ किलो) राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या गौरव सोलंकीवर धक्कादायक विजयाची नोंद करीत इंडिया खुल्या आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.

याशिवाय सहा वेळा विश्वविजेती मेरी कोम, आशियाई सुवर्णपदक विजेत्या अमित पांघल (५२ किलो) आणि चार वेळा आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील पदकविजेत्या शिवा थापाने (६० किलो) अंतिम फेरी गाठून सुवर्णपदकाच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.

सचिनने गौरवचा ५-० असा पराभव केला. २५ वर्षीय शिवाने पोलंडच्या डी. क्रिस्टियान शेपांस्कीला ५-० असे नमवले. त्यांची अंतिम फेरीत मनीष कौशिकशी गाठ पडणार आहे. कौशिकने अंकितला ५-० असे नामोहरम केले. गौरव बिधुरीचे आव्हान संपुष्टात आले. थायलंडच्या चाटचाय डेशा बुटीने त्याला हरवले. ५१ किलो गटात मेरीने निकात झरीनला ४-१ असे पराभूत केले. भारताला ५७ (३१ पुरुष आणि २६ महिला) पदकांच्या आशा आहेत.

 

First Published on May 24, 2019 12:43 am

Web Title: india open boxing tournament 2019 2
Just Now!
X